(म्हणे) ‘सनातन संस्थेला उघडे पाडण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून ट्विटर ट्रेंड चालू करणार !’ – सनातनद्वेषी आणि धर्मांध यांची चळवळ

  • ‘कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही’, हे धर्मांध आणि सनातनद्वेषी यांनी लक्षात ठेवावे !                              
  • धर्मांध आणि सनातनद्वेषी यांनी कधीही देशातील भ्रष्टाचारी, जिहादी, आतंकवादी, शहरी नक्षलवादी, देशद्रोही यांना उघडे पाडण्यासाठी अशा प्रकारची चळवळ राबवली नाही, हे लक्षात घ्या !

मुंबई – येत्या १६ ऑक्टोबरच्या सायंकाळी ५ वाजल्यापासून सनातनद्वेषी आणि धर्मांध ट्विटरवरून सनातन संस्थेला उघडे पाडण्यासाठी ‘ट्रेंड’ चालू करणार आहेत. ही माहिती त्यांनी ट्विटरवरून चालू केली आहे. याविषयी माहिती ‘अब्दुलहक मुसा’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली आहे. अन्य एका पोस्टमध्ये इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

या ‘ट्रेंड’साठी गुजरातमधील पाटीदार समाजाचा तथाकथित नेता हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, देहलीतील आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा, ‘एन्डीटीव्ही हिंदी’ वृत्तवाहिनीचे संपादक रवीश कुमार, एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी, ढोंगी धर्मगुरु आचार्य प्रमोद, भ्रष्टाचारी लालूप्रसाद यादव आदींना ‘टॅग’ (माहिती देण्यात येणे) करण्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF