रावणाविषयी पाठ्यपुस्तकातून शिकवण्याची मागणी करणे सर्वथा अयोग्य ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

श्री दुर्गामाता दौडीचा चौथा दिवस !

सांगली, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – एका संघटनेने रावणाविषयी पाठ्यपुस्तकातून लिखाण शिकवण्याची मागणी केली. रावणाची महिलांकडे बघण्याची दृष्टी चांगली नव्हती. असा आदर्श आपण समाजासमोर ठेवू शकत नाही. त्यामुळे रावणाविषयी पाठ्यपुस्तकात शिकवण्याची मागणी करणे सर्वथा अयोग्य आहे. लक्ष्मणाची दृष्टी नेहमी सीतेच्या चरणाशी असायची. तो सीतेकडे कायमच माता म्हणून पहायचा. त्यामुळे लक्ष्मण हा मानवजातीसाठी आदर्श आहे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीच्या चौथ्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF