चर्चासत्राच्या वेळी हिदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणार्‍या ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीच्या निवेदिका निखिला म्हात्रे !

‘मुलाखत कशी घेऊ नये’, हे शिकवणारे हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांचे निवेदक !

आपण बोलावल्याने आलेल्यांचा मान आपण राखला पाहिजे, हेही त्यांना कळत नाही ! यांच्यामुळे पुढील पिढीवर काय संस्कार होतील, याचा विचारही करवत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले       

‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीच्या निवेदिका निखिला म्हात्रे

२० ऑगस्ट या दिवशी ‘टिव्ही ९’ या वृत्तवाहिनीवर ‘आखाडा’ या कार्यक्रमात ‘सनातनमुळे हिंदु धर्माची बदनामी होत आहे का ?’ या विषयावर घेण्यात आलेल्या चर्चेत निवेदिका निखिला म्हात्रे या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांना ‘दाभोळकर, लंकेश, पानसरे प्रकरणातील सर्व आरोपींचे वकीलपत्र तुमचे वकील कसे काय घेतात ?’, असा प्रश्‍न पुन:पुन्हा विचारून त्यांना बोलू देत नव्हत्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now