भारतीय चित्रपटांवर बंदी घाला ! – पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेची मागणी

भारतीय चित्रपटसृष्टीत पाकिस्तानी कलाकारांना काम देण्यावरही भारताने बंदी घातली पाहिजे !

इस्लामाबाद – जर भारतात पाकिस्तानचे चित्रपट प्रदर्शित होत नसतील, तर मग पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करायला का अनुमती द्यावी ? पाकिस्तानी चित्रपटसृष्टीचा विकास करायचा असेल, तर भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात पूर्णपणे बंदी घालायलाच हवी, अशी मागणी पाकिस्तान चित्रपट निर्माता संघटनेने केली आहे. यासाठी लाहोर उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनादेखील पत्र लिहिण्यात येणार आहे.

१. या संघटनेचे अधिकारी चौधरी इजाझ कमरान म्हणाले की, भारतीय चित्रपट प्रदर्शित करून चित्रपट वितरक पैसे कमावतात; पण यामुळे पाकच्या चित्रपटसृष्टीची प्रगती होत नाही. भारतीय चित्रपटांमुळे स्थानिक चित्रपटांना वाव मिळत नाही.

२. ‘भारतीय चित्रपटामुळे वितरक चांगली कमाई करतात, वितरकांचा तोटा भरून निघतो. त्यामुळे चित्रपटांवर बंदी घालणे पूर्णपणे चुकीचे आहे’, असे पाकिस्तानमधील वितरकांचे म्हणणे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now