घरवापसीसाठी प्रयत्न करणार्‍या न्यायाधिशाच्या पत्नीची धर्मांतरित ख्रिस्ती सुरक्षारक्षकाकडून हत्या

बाटगे अधिक कडवे असतात, याचे आणखी एक उदाहरण !

केंद्रात आणि २० राज्यांत भाजपचे सरकार येऊनही धर्मांतरविरोधी कायदा बनवण्यात आला नाही, त्याचाच हा परिणाम समजायला हवा ! आतातरी भाजप कायदा करणार का ?

गुरुग्राम (हरियाणा) – येथे १३ ऑक्टोबरला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कृष्णकांत यांची पत्नी रितू आणि त्यांचा मुलगा ध्रुव यांच्यावर त्यांचा पोलीस सुरक्षारक्षक महिपाल यादव याने भर रस्त्यात चारचाकी गाडीमध्येच सरकारी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. यात रितू यांच्यावर उपचार चालू असतांना मृत्यू झाला, तर मुलगा अत्यवस्थ आहे. महिपाल यादव गेल्या दीड वर्षांपासून न्या. कृष्णकांत शर्मा यांच्या सुरक्षेत होता. त्याने ८ मासांपूर्वी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता, असे म्हटले जात आहे. या संदर्भात पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत महिपाल याने, ‘कृष्णकांत यांची पत्नी त्याला गेल्या काही मासांपासून पुन्हा हिंदु होण्यासाठी दबाव आणत होती. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. त्याला कंटाळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या’, असे सांगितले आहे. असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. तसेच त्याला सुट्टी देण्यात येत नसल्याने रागातून त्याने गोळ्या झाडल्या, असेही म्हटले जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now