नवरात्री व्रतातील एक अंग असलेल्या अखंड दीप स्थापनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व !

घटाजवळ सतत नऊ दिवस एक दीप अखंड तेवत ठेवण्यात येतो. अखंड प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या ज्योतीत ब्रह्मांडात प्रक्षेपित झालेेले शक्तीचे तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता असते. त्यामुळे तेथील वातावरणातील सात्त्विकता वाढते आणि अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून होतो.

१. अखंड दीपाची स्थापना

भूमीवर वास्तुपुरुषाला आवाहन केले जाते. भूमीवर पाण्याचा त्रिकोण काढला जातो. त्यावर गंध, फूल, अक्षता आदी घालून ‘दीप आधारयंत्र’ तयार केले जाते. त्यावर दीपाची स्थापना करतात. त्यानंतर दीप प्रज्वलित केला जातो. नंतर दीपाची पंचोपचारे पूजा करतात. दीपाला प्रार्थना केली जाते. या प्रार्थनेचा थोडक्यात अर्थ आहे, ‘व्रत दृढतेने होण्यासाठी साहाय्य कर.’ हा दीप तुपाचा किंवा तेलाचा असावा. मेणाचा नसावा. तूप हे सर्वांत अधिक सत्त्वगुणी, तेल रजोगुणी, तर मेण तमोगुणी आहे. हा दीप नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यात वारा, तेल अल्प पडणे, काजळी धरणे, यांसारख्या कोणत्याही कारणांमुळे खंड पडल्यास ती कारणे लगेच दूर करावीत. दीप प्रज्वलित करावा आणि हा खंड पडल्याबद्दल प्रायश्‍चित्त घ्यावे. प्रायश्‍चित्त म्हणून श्री दुर्गादेवीचा १०८ वेळा नामजप करावा.

२. अखंड दीपप्रज्वलनाचे सूक्ष्मस्तरीय परिणाम

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’ आणि सनातन-निर्मित ‘शारदीय नवरात्राचे शास्त्र आणि विधी’ हा दृकश्राव्य लघुपट)


Multi Language |Offline reading | PDF