पुतिन यांनी नेताजी बोस आणि शास्त्री यांच्या मृत्यूंच्या धारिका उघड कराव्यात ! – डॉ. स्वामी

नवी देहली – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ते भारताचे मित्र असल्याचा दाखला देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादुर शास्त्री यांच्या रशियात झालेल्या मृत्यूंच्या विषयीच्या धारिका सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली आहे. डॉ. स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी नेताजी बोस यांच्या हत्येमध्ये रशियाचे माजी राष्ट्रपती जोसेफ स्टालिन यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. ‘बोस यांनी रशियाकडे आश्रय मागितला होता. त्यानंतर तिथेच त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांची हत्या करण्यात नेहरू आणि जपान यांचा कट होता’, असेही म्हटले होते. (रशिया कधीही ही माहिती उघड करणार नाही; कारण यामुळे त्याचा आणि काँग्रेसचा खरा तोंडवळा उघड होईल ! – संपादक)

सोनिया गांधी रशियामध्ये का गेल्या होत्या, हेही पुतिन यांनी सांगावे !

डॉ. स्वामी पुढे म्हणाले की, पुतिन यांना हेही सांगावे लागेल की, सोनिया गांधी त्यांना भेटण्यासाठी २ वेळा रशियामध्ये कशासाठी गेल्या होत्या. पुतिन यांना सोनिया गांधी आणि त्यांचे वडील यांचे के.जी.बी. या रशियाच्या गुप्तचर संस्थेशी असलेल्या संबंधांविषयी माहिती द्यावी लागेल. सध्या पुतिन दोन्ही बाजूंनी भारताशी खेळत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now