साधकांनो, आपत्काळात औषधे उपलब्ध नसतांना उपयुक्त ठरणारी ‘न्यूरोथेरेपी’ ही उपचार पद्धत शिकून आपत्काळाला सामोरे जायला सिद्ध व्हा !

‘सध्या अनेक साधकांना विविध शारीरिक त्रास होत आहेत. पुढे येणार्‍या आपत्काळात औषधे उपलब्ध होणार नाहीत. अशा वेळी ‘न्यूरोथेरेपी’ ही उपचार पद्धत अतिशय लाभदायक ठरणार आहे.

१. ‘न्यूरोथेरेपी’ उपचार पद्धत

स्नायू, सांधे, पाठीचा कणा, यांचे विविध आजार असल्यास (उदा. लंबर, सर्व्हायकल स्पाँडीलायटिस, सायटिका, फ्रोजन शोल्डर, पॅरालीसिस, मायग्रेन इत्यादी) या उपचार पद्धतीत स्नायू, शिरा आणि सांधे यांची विशिष्ट पद्धतीने हालचाल, तसेच मर्दन करून ते मोकळे करतात.

२. न्यूरोथेरेपीचे लाभ

अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेत हे उपचार अल्प काळात होतात, तसेच त्यांची परिणामकारकताही अधिक आहे.

‘रुग्णसेवेची एक संधी’, या दृष्टीने अनेक साधकांनी ही उपचार पद्धत शिकून घेणे आवश्यक आहे. वैद्य आणि परिचारिका (नर्स) यांना ही उपचार पद्धत शिकणे सोपे जाईल. अन्य साधकांनाही ही उपचारपद्धत शिकता येईल.

‘न्यूरोथेरेपी’ ही उपचार पद्धत शिकण्याची संधी गुरुकृपेने रामनाथी आश्रमात उपलब्ध झाली आहे. रामनाथी आश्रमात या उपचार पद्धतीचे प्रशिक्षण १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत देण्यात येणार आहे.

३. हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणार्‍या साधकांच्या निवडीचे निकष

अ. ही उपचार पद्धत शिकण्याची आवड असणारे

आ. शारीरिक आणि बौद्धिक क्षमता चांगली असणारे

इ. रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रतिदिन पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा न्यूनतम २ घंटे देऊ शकणारे उपरोक्त निकष पूर्ण करणार्‍या साधकांनी त्यांची नावे आणि पुढे दिलेल्या सारणीत माहिती भरून १३.१०.२०१८ या दिवसापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावी. त्यानंतर रामनाथी आश्रमातून नावे अंतिम झाल्यावरच तिकिटाचे आरक्षण करावे.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now