घुसखोर रोहिग्या मुसलमानांचे रेल्वेद्वारे दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन !

आतंकवादी संघटनांचे सदस्य आणि धर्मांध यांचाही समावेश

  • घुसखोरांना आधी देशात घुसू दिले आणि आता ते संपूर्ण देशात स्वत:चे जाळे पसरवत असतांनाही भारतीय शासनकर्ते निष्क्रीयच आहेत, हे संतापजनक !                                                                               
  • अशा घुसखोरांच्या विरोधात पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – भारतीय गुप्तचर विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, घुसखोर रोहिंग्या मुसलमान भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांतून दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन करत आहेत. यात विशेष करून केरळ आणि तेलंगण या राज्यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत ‘हरकत उल जिहाद अल इस्लामी’ या आतंकवादी संघटनांचेही सदस्य आहेत. तसेच काही धर्मांधही या घुसखोरांना भडकवत आहेत.

१. या अहवालात पुढे म्हटले आहे की, आसाममधून येणारी गुवाहटी-त्रिवेंद्रम सेंट्रल एक्सप्रेस, देहलीतून जाणारी नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस आणि आसामच्या डिब्रूगड येथून कन्याकुमारी येथे जाणार्‍या विवेक एक्सप्रेसमधून या घुसखोरांनी या राज्यांमध्ये प्रवेश केला आहे. या अहवालानंतर गृहमंत्रालयाने केरळ राज्याला सतर्क केले आहे. (अशा सतर्कतेचा इशारा देऊन काही लाभ होणार आहे का ? तेथे सत्तेवर असणारे माकपवाले या रोहिंग्या घुसखोरांना घरजावयाप्रमाणे वागवतील, हे वेगळे सांगायला नको ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF