मुंबई येथे बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्यामुळे २ धर्मांधांना अटक !

नालासोपारामध्ये हिंदुत्वनिष्ठांकडे बॉम्बचा कथित साठा सापडल्यावर थयथयाट करणारी प्रसिद्धीमाध्यमे या वृत्ताची ‘ब्रेकिंग न्यूज’ दिवसभर दाखवत नाहीत, हे ध्यानात घ्या !

मुंबई – येथील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत सुतळी बॉम्बच्या दारूपासून बॉम्ब बनवणार्‍या २ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. बॉम्ब बनवत असतांना स्फोट झाल्यामुळे १ तरुण घायाळ झाला आणि स्फोटाचा आवाज १ किलोमीटर परिसरापर्यंत गेला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. (स्फोटाचा आवाज झाला नसता, तर धर्मांध पकडले गेले नसते. असे कित्येक बॉम्ब मुंबईत बनत असतील, याची पोलिसांना कल्पना नाही, असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल ! – संपादक) स्फोटाच्या ठिकाणी पोलिसांना बॉल बेअरिंग, काचेचे तुकडे आणि खिळे सापडले. हे साहित्य साधारणतः आतंकवादी बॉम्ब बनवतांना वापरतात. सध्या हे सगळे स्फोटकसदृश पदार्थ तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफ्एस्एल्ला) पाठवण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले दोघेही आरोपी मूळ बंगालचे रहिवासी असून येथील गरीब नवाज रोडवर नुरा बाजार भागात रहात होते. (धर्मांधांनी देशात ठिकठिकाणी येथील रस्त्यांना त्यांची नावे देऊन स्वतंत्र वसतीस्थाने वसवली आहेत. उद्या पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास त्यांना हेच धर्मांध साहाय्य करतील यात शंका नाही ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now