गुंड, लुटारू आणि मारेकरी !

संपादकीय

सतत होणारे भारनियमन आणि वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. आमदाराने दूरभाष केल्यावर अधिकार्‍यांकडून प्रतिसाद दिला जात नाही. अशात भारनियमनावरून जाळपोळ-मोडतोड झाली, तर त्याचा प्रारंभ माझ्या मतदारसंघातून होईल. अभियंत्याच्या तोंडाला काळे फासल्यावर त्यांना आमचा दूरध्वनी ऐकू जाईल’, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महावितरणाच्या अभियंत्याला दिल्याचे वृत्त आहे. सर्वसाधारपणे गुंड अशा धमक्या देतात. अशा धमक्या देणार्‍यांच्याच पक्षाच्या लोकांनी हे भारनियमन न होण्यासाठी पूर्वी शेतकर्‍यांची कशी लूट केली, ते पहाणे आवश्यक आहे.

वर्ष २०१२ मध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र ‘भारनियमन मुक्त’ करण्याची घोषणा करण्यात आली. घोषणा तर ऐकायला चांगली आणि सकारात्मक होती. ते करण्यासाठी खरोखरच तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने काही अभ्यास करून कृती केली असती आणि काही प्रमाणात तरी भारनियमन अल्प करण्याचा प्रयत्न केला असता, तरी शेतकर्‍यांसह शहरातील नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला असता; पण एक तरी काम प्रामाणिकपणे जनतेसाठी केले असेल, तर ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार कसले ? वर्ष २००८ ला सुनील तटकरे, तर वर्ष २०१० ते २०१४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे ऊर्जा खाते होते. वरील घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारमधील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले आहे, हे पाहिले, तर अंगावर अक्षरशः काटा येईल. आव्हाड यांच्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर मुद्दामहून हे सांगण्याचा प्रपंच करीत आहोत. ३-४ वर्षांपूर्वी अव्वाच्या सव्वा वीज आणि पाणी देयके येण्याचे प्रमाण सर्वत्र मोठ्या प्रमाणात वाढले होते, हे सर्वांना आठवत असेल. आपल्यापैकी अनेकांनी या समस्येला तोंडही दिले असेल. विशेष म्हणजे कोट्यवधीचे देयक असले, तरी हे देयक भरल्याशिवाय त्याच्या तक्रारीवर पुढील कारवाईही होत नसे. असे का होत आहे, याचे कारणही कळत नव्हते. त्याचा उलगडाही पुढील सूत्रावरून होईल; एवढेच नव्हे, तर कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी भाजप सरकारला उत्तरदायी ठरवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे जनताद्रोही स्वरूपही उघड होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या घोषणेनुसार शहरी भागात भारनियमन अल्प करण्याचे ठरले; परंतु त्यासाठी महाराष्ट्र नियामक आयोगाला ‘महावितरण कार्यालय तोट्यात नाही’, हे दाखवणे आवश्यक होते. मग हे कसे दाखवणार ? त्यात बळी देण्याचे ठरले ते रस्त्यावरची दिवाबत्ती, शेतकर्‍यांचे पंप आणि पाणीपुरवठा या स्तरांवर देयके भरणार्‍या ग्राहकांचे. त्यांची देयके वाढवण्याचे ‘फर्मान’ महावितरणाच्या अधिकार्‍यांना सोडण्यात आले. त्यासाठी चक्क ग्राहकांना खोटी, म्हणजेच भरसाठ वाढवून देयक पाठवण्याची कार्यवाही चालू झाली. प्रत्येक तालुक्याला या तिन्ही स्तरांवरील देयकाची ठराविक रक्कम वाढली पाहिजे, असा ‘तोंडी आदेश’ निघाला. त्याप्रमाणे खालच्या कर्मचार्‍यांनी थेट देयकाची रक्कम वाढवण्याची कार्यवाही केली. पाणीपुरवठ्याची देयके १४ कोटींनी आणि रस्त्यावरील दिवाबत्तीची देयके ४० कोटींनी वाढवण्यात आली. एवढ्याने भागेना म्हणून मग ‘शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवून त्यांचा गळा घोटण्या’चा निर्णय घेण्यात आला. ३ एच्पीचा शेतीपंप वापरणार्‍या २ लाख ५४ सहस्र ६३७ शेतकर्‍यांना ५ एच्पीची देयके, ५ एच्पीचा पंप वापरणार्‍या १ लाख ३८ सहस्र ४७३ शेतकर्‍यांना ७.५ एच्पीची आणि ७.५ एच्पीचा पंप वापरणार्‍या १२ सहस्र ६०४ शेतकर्‍यांना १० एच्पीची देयके लावण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४ लाख ५ सहस्र ७२४ शेतकर्‍यांची देयके वाढवण्यात आली. वाढीव देयकांमुळे या शेतकर्‍यांवर एकूण ८० कोटी रुपयांचा बोजा झाला.

माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीत लातूर येथील महावितरणाच्या कार्यालयातील वाणिज्य शाखेचे माजी उपव्यवस्थापक (ज्युनिअर मॅनेजर) दिवाकर उरणे यांनी ‘प्रकाशगड’ या महावितरणच्या कार्यालयातून खोटी देयके दिल्याचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत. परळीमध्ये भारनियमन केले म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले. चुकीची कारवाई झाली म्हणून कामगार महासंघ त्यांच्या बाजूने उभा राहिला. उरणे संभाजीनगर खंडपिठात गेले. खंडपिठाने वाढीव देयकांची चौकशी चालू असल्याचे मान्य केले; परंतु आजातागायत ही चौकशी काही पूर्ण झालेली नाही. अन्य एका माहितीनुसार ३५ लाख शेतकर्‍यांना अधिक रकमेची देयके गेली आहेत. ही वाढीव रक्कम अंदाजे ५ – ६ सहस्र कोटी रुपये एवढी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे दायित्व घेणार का ?

आजच्या घडीला महाराष्ट्रात लक्षावधी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, त्या कर्जबाजारी होऊन आणि दुष्काळामुळे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सिंचन घोटाळा करून शेतकर्‍यांना पाणी मिळू दिले नाही. दुसरीकडे अशा प्रकारे शेतीपंपाची वीजदेयके भरमसाठ प्रमाणात वाढवून त्यांचे प्राण कंठाशी आणले. कित्येकांनी निराशेने आणि तणावाखाली येऊन आत्महत्या केल्या. आता या शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना कोण उत्तरदायी आहे, असे म्हणायचे ? सनातनला पुरोगाम्यांचे खुनी म्हणून खोटा आरोप करून हिणवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच प्रतिनिधींनी याचे उत्तर द्यावे की, लक्षावधी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना कोण उत्तरदायी आहे ? त्याचे उत्तरदायित्व त्यांनी स्वतः घेतले नाही, तरी कालगतीनुसार ते त्यांच्या माथी येईलच !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now