रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय !

अशा दैवी आश्रमावर सनातनद्वेष्टे मात्र दगडफेक आणि शिवीगाळ करतात !

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात अनोखी शक्ती जाणवणे

‘रामनाथी आश्रमभेटीच्या आमच्या या अल्प कालावधीत मला पुष्कळ शांत वाटलेे. येथील साधकांना भेटून मला अतिशय आनंद झाला. मला येथे पुन्हा यायचे आहे. काही काळ ध्यान केल्यानंतर जाणवणारी अनोखी शक्ती आश्रमातील ध्यानमंदिरात मला जाणवली !’

– श्रीमती मीनाक्षी गुप्ता आणि श्री. सिद्धार्थ गुप्ता, कोलकाता (७.१०.२०१७)

येथील साधक आपल्या वर्तनाने आलेल्या व्यक्तींची मने जिंकतात !

‘आश्रम परिसर अतिशय शांत असून भेट देण्यासाठी हे अगदी योग्य ठिकाण आहे. मला अधिक कालावधीसाठी येथे पुन्हा यायचे आहे. येथील साधक आश्रम भेटीसाठी आलेल्या लोकांशी पुष्कळ सहकार्याने वागतात अन् त्यांची मने जिंकतात.’

– श्रीमती काजल एस्. ओस्वाल, कोल्हापूर (७.१०.२०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now