घटस्थापना करणे (मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात माती घालून सप्तधान्ये पेरणे)

आजपासून चालू होत असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…

आजपासून शारदीय नवरात्रास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने घटस्थापना आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र जाणून घेऊया. नवरात्रातील व्रताला अनेक घराण्यांत कुलाचाराचे स्वरूप असते. या व्रताचा प्रारंभ आश्‍विन शुक्ल प्रतिपदेस होतो.

१. वेदी तयार करून सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करणे

घरात पवित्र जागी एक वेदी (मातीचा थराने केलेला आकार) तयार करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजादेवीची आणि नवार्णयंत्राची स्थापना करावी. यंत्राच्या शेजारी घट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी.

आध्यात्मिक महत्त्व : मातीमध्ये पृथ्वीतत्त्व आणि भूदेवीची स्पंदने अधिक प्रमाणात कार्यरत असतात. नवरात्रीमध्ये कार्यरत असणार्‍या देवीतत्त्वाची सूक्ष्मातीसूक्ष्म स्पंदने मातीतील भूमीतत्त्वाकडे शीघ्रतेने आकृष्ट होत असल्याने मातीची वेदी सिद्ध करण्यास सांगितले आहे. या वेदीमध्ये आकृष्ट झालेली देवीतत्त्वाची स्पंदने वेदीवर स्थापन केलेल्या अष्टभुजादेवीच्या प्रतिमेत आणि नवार्णयंत्रात संक्रमित होऊन देवीची प्रतिमा अन् नवार्णयंत्र देवीतत्त्वाने भारित होते.

२. घटस्थापना आणि मालाबंधन करून मातीत सप्तधान्य पेरणे

नवरात्रोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे. शेतातील मृत्तिका (माती) आणून तिचा जमिनीवर पूर्व ते पश्‍चिम दिशेला दोन पेरे (बोटाची) जाड चौकोनी थर करावा आणि त्यात जव, गहू, तीळ, मूग, राळे, सावे आणि चणे ही सप्तधान्ये घालावीत.

आध्यात्मिक महत्त्व : घटामध्ये पृथ्वीतत्त्वाच्या लहरी कार्यरत असल्याने घटामध्ये देवीतत्त्वाच्या शक्तीलहरी आकृष्ट होतात. घटाच्या आतील पोकळीत देवीतत्त्वाने युक्त असणार्‍या निर्गुण चैतन्याच्या लहरी आकृष्ट होतात. शेतातील मातीमध्ये भूमीतत्त्वासह बैलाची शक्ती आणि धर्मतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. शेतातील माती आणून त्यामध्ये सप्तधान्य पेरल्याने धर्मसंस्थापनेसाठी कार्यरत असणार्‍या देवीतत्त्वाच्या धर्मशक्तीने युक्त असणार्‍या लहरी आकृष्ट होऊन त्या धान्यातून फुटणार्‍या अंकुरातून वातावरणात प्रक्षेपित होतात.

३. कलशात विविध वस्तू घालणे

मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी, गंध, फुले, दूर्वा, अक्षता, सुपारी, पंचपल्लव, पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात.

३ अ. वस्तू, कार्यरत पंचमहाभूत आणि कार्यरत देवतातत्त्व

टीप १ – पंचपल्लव : पाच प्रकारच्या झाडांची पाने. एका मतानुसार आंबा, उंबर, पिंपळ, जांभूळ आणि वड यांची पाने.

टीप २ – पंचरत्न : एका मतानुसार सोने, चांदी, हिरा, मोती आणि पोवळे. दुसर्‍या मतानुसार सुवर्ण, माणिक, नीलमणी, पद्मराग (पाचू) आणि मोती.

– कु. मधुरा भोसले (यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०१७)

४. घटस्थापनेसाठी वापरावयाची सप्तधान्ये आणि त्यांच्यापासून होणारा लाभ !

५. कलशात घालावयाच्या इतर वस्तू आणि त्यांच्यापासून होणारा लाभ !

– सौ. प्रार्थना बुवा (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), १२.९.२००५

* टीप – काही प्रांतांत हे धान्य वापरले जाते.

६. शास्त्र आणि महत्त्व

मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात पृथ्वीतत्त्वरूपी मातीमध्ये सप्तधान्यांच्या रूपात आप आणि तेज यांचे अंश पेरून त्या बिजांतून प्रक्षेपित होणार्‍या आणि बंद घटात उत्पन्न झालेल्या उष्ण ऊर्जेच्या साहाय्याने नाद निर्माण करणार्‍या लहरींकडे अल्प कालावधीत ब्रह्मांडातील तेजतत्त्वात्मक आदिशक्तीरूपी लहरी आकृष्ट होण्यास साहाय्य होते. मातीच्या कलशात पृथ्वीच्या जडत्वदर्शकतेमुळे आकृष्ट झालेल्या लहरींना जडत्व प्राप्त होऊन त्या दीर्घकाळासाठी त्याच ठिकाणी स्थित होण्यास साहाय्य होते, तर तांब्याच्या कलशामुळे या लहरींचे वायूमंडलात वेगाने प्रक्षेपण होऊन संपूर्ण वास्तूला त्याचा मर्यादित काळासाठी लाभ होण्यास साहाय्य होते. घटस्थापनेमुळे शक्तीतत्त्वाच्या तेजरूपी रजोलहरी ब्रह्मांडात कार्यमान झाल्यामुळे पूजा करणार्‍याच्या सूक्ष्म-देहाची शुद्धी होते.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देवीपूजनाचे शास्त्र (कुकुंमार्चन, ओटी भरणे आदींचे शास्त्र !)’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सनातनच्या साधकांना अशाप्रकारे सूक्ष्मातून ज्ञान प्राप्त होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now