पोलीस बनले आतंकवादी !

संपादकीय

काश्मीरमध्ये ३ वर्षांत १२ पोलीस हे आतंकवादी झाल्याचे समोर आले आहे. काश्मीरमध्ये पोलीसदलातील पोलीस आतंकवाद्यांना मिळाल्याचे वृत्त आता सामान्य झाले आहे. त्याविषयी तेथील लोकांना काही वाटत नाही. एवढेच काय, तेथील पोलीसदलही याविषयी गंभीर आहे, असेही चित्र दिसत नाही. ‘काश्मीरमधील मुसलमान हे गरीब, बिच्चारे आणि पीडित आहेत’, असे वारंवार आपल्याला सांगण्यात येते. ‘या परिस्थितीमुळेच ते आतंकवादी बनतात’, असेही चित्र रंगवण्यात येते; मात्र तेथील परिस्थिती वेगळी आहे. मध्यंतरी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असलेला धर्मांध हा आतंकवाद्यांना जाऊन मिळाल्याचे समोर आले. केवळ गरीबच नाही, तर उच्चशिक्षित इंजिनियर, डॉक्टर अथवा अन्य क्षेत्रांतील धर्मंध युवक हे आतंकवादी संघटनांकडे वळत आहेत. ‘आतंकवादाकडे वळणार्‍या धर्मांधांविषयी जे निष्कर्ष काढले जातात, ते चुकतात कसे ?’, हा एक गहन प्रश्‍न आहे. आतंकवादाकडे वळण्यामागे जिहादी शिकवण हे एकमेव कारण आहे. हे तरुण असे शिकवणार्‍यांच्या संपर्कात आल्यावर त्यांचे वर्तन पालटते. काश्मीरमध्ये हेच चालू आहे. तेथील मशिदी आणि मदरसे यांमधून जिहादी प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळेच तेथील धर्मांध शस्त्र हातात घेतात. काश्मीरमध्ये अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. प्रत्येक सरकारने तेथील तरुण भरकटू नये, यासाठी विविध योजना राबवल्या; मात्र त्याचा काय लाभ झाला ? एखाद्या समस्येवर उपाययोजना काढायची असेल, तर समस्येच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करावा लागतो. काश्मीरची समस्या सोडवण्याच्या बाता सर्वच मारत असतात; मात्र त्याच्या मुळाशी जाण्याचे धारिष्ट्य कोणी दाखवत नाही अथवा त्याच्या मुळाशी कोणाला जायचेच नसते. असे केले, तर या आतंकवादाचा रंग ‘हिरवा’ आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. हेच राजकारण्यांना आणि व्यवस्थेला नको आहे. आजच्या निधर्मीवादी युगात असे करणे म्हणजे महापाप होय. राजकारणी, निधर्मीवादी, पुरोगामी आणि बुद्धीजीवी हे नेहमीच ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे तुणतुणे वाजवतांना दिसतात. हे तत्त्वच मुळात किती फोल आहे, हे देशभरात जी आतंकवादी आक्रमणे होत आहेत, त्यावरून दिसून येते. आताही काश्मीरमधील पोलीस जे आतंकवाद्यांना जाऊन मिळाले आहेत, त्यांची आकडेवारी समोर आली; मात्र पोलिसांना झालेली जिहादची लागण रोखण्यासाठी काय करायला हवे, याविषयी कोणीही बोलायला सिद्ध नाही. वास्तविक आपल्या सहकार्‍याची मानसिकता इतर सहकारी पोलीस ओळखू शकत नाहीत, हे कसे ? याचा अर्थ त्यांचाही अशा धर्मांध पोलिसांना छुपा पाठिंबा होता, असे समजायचे का ? ‘काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करायचा आहे ?’, असे भाजप सरकार म्हणते. ‘काश्मीरमध्ये पोलीसच आतंकवादी होत असतील, तर हे ध्येय कसे साध्य करायचे ?’, याचे उत्तर भाजप सरकारला शोधायचे आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now