हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांवरून केली जाणारी राष्ट्र आणि धर्म यांची अपकीर्ती रोखण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करा !

साधकांना सूचना, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी हिंदू यांना आवाहन

सध्या वृत्तवाहिन्यांवरून राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संदर्भातील विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. या चर्चासत्रांत राष्ट्र-धर्मप्रेमी प्रवक्त्यांसह तथाकथित पुरोगामी, विचारवंत, राजकीय नेते आदींना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात येते; मात्र हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांवर बहुतांश वेळा चर्चेच्या नावाखाली हिंदु धर्माची किंवा हिंदुत्वाची अपकीर्ती करणारे विषय मांडले जातात. अशा चर्चासत्रांमध्ये धर्मप्रेमी प्रवक्त्यांना धर्माची बाजू योग्य प्रकारे मांडू न देता उलट या प्रवक्त्यांशी चर्चासत्रातील निवेदकांसह अन्य हिंदुद्वेषी वक्ते आक्रस्ताळेपणा करत विषय मांडू देत नाहीत. अशा प्रसंगी अशी चर्चासत्रे किंवा वृत्ते पहाणारे धर्मप्रेमी वाचक, हितचिंतक किंवा हिंदुत्वनिष्ठ यांनी समाजासमोर राष्ट्र आणि धर्म विषयक सत्य बाजू जाण्यासाठी फेसबूक, ट्वीटर, व्हॉट्सअ‍ॅप आदी सामाजिक प्रसारमाध्यमांवरून अशा हिंदुद्वेषी विषयांचे खंडण, प्रबोधन करणार्‍या किंवा अशा चर्चासत्रांच्या विरोधात मत मांडणार्‍या ‘पोस्ट’ कराव्यात. त्यामुळे धर्महानी थांबण्यास साहाय्य होईल, तसेच धर्मविषयक प्रबोधन केल्यामुळे धर्मकार्यही होईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now