हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्ह्यातील जुलै २०१८ या मासातील प्रसारकार्य

१. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून जागृती

१ अ. श्री शनैश्‍वर मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलन : १७.७.२०१८ या दिवशी ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये मंदिर व्यवस्थापन समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. असे असतांना शासनाला शिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थान कह्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यामुळे शासनाने श्री शनैश्‍वर देवस्थानचे सरकारीकरण तात्काळ रहित करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावे, तसेच शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी’, या मागणीसाठी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

१ आ. ‘हज हाऊस’ला टीपू सुलतानचे नाव देण्याच्या कर्नाटक शासनाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन : इतिहासात क्रूरकर्मा म्हणून नोंद असणार्‍या टीपू सुलतानचे नाव ‘हज हाऊस’ला देण्याचा निर्णय कर्नाटकमधील जेडीएस् आणि काँग्रेस यांच्या शासनाने घेतला आहे. हा निर्णय रहित करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

२. कल्याण येथे सार्वजनिक उत्सव समन्वय शिबीर

कल्याण येथे २९.७.२०१८ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात श्री. गिरीश धोकिया, अध्यक्ष, दूधनाका गणेशप्रेमी मंडळ, श्री. बाळा परब, रामबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके, भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष यांच्यासह ३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिबिराच्या शेवटी झालेल्या गटचर्चेत अनेकांनी सार्वजनिक उत्सवाचे आयोजन करतांना त्यांना आलेले कटू आणि चांगले अनुभव सांगितले. तसेच ‘आदर्श गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटनही करूया आणि धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरणही करूया’, असेही सांगितले. या वेळी हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता विवेक भावे  यांनी ‘सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी मंडळांना सातत्याने अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिका यांच्याकडून विविध प्रकारच्या अनुमत्या घ्याव्या लागतात. त्यामुळे अनेक वेळा मंडळांना त्याचा त्रास होत असतो. हा त्रास होऊ नये; म्हणून शासनाने ‘एक खिडकी योजना’ राबवावी, यासाठी सर्व मंडळांनी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊया’, असे आवाहन केले. त्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

– श्री. बळवंत पाठक, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, ठाणे आणि रायगड.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now