‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीकडून कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

  • साधकांनी स्फोट घडवून आणल्याचा खोटा दावा !

  • सूत्रसंचालकांकडून हिंदु जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांना दमदाटी !

‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली सनातनची अपकीर्ती करणार्‍या ‘इंडिया टुडे’चा ‘बोलविता धनी कोण ?’, याची प्रथम चौकशी होणे आवश्यक !

#SanatanTerrorSansthaConversation heats up between Rahul Kanwal and Ramesh Shinde, Spokesperson of Sanatan Sanstha Watch #NEWSROOM LIVE at http://bit.ly/IT_LiveTV

Posted by India Today on Monday, October 8, 2018

मुंबई, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘सनातन टेरर संस्था’ (सनातन आतंकवादी संघटना) या मथळ्याखाली कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ दाखवले. यात चित्रफितीत मोडतोड करून ‘सनातन संस्थेच्या साधकांनी अनेक बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असल्याची स्वतःच मान्य केले’, अशी धादांत खोटी माहिती प्रसारित केली. या चित्रफितीचे प्रसारण करत असतांना सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी चर्चाही घडवून आणण्यात आली. ‘इंडिया टुडे’च्या पत्रकारांच्या विशेष चौकशी पथकाने हे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी ‘अध्यात्माचे नाही, तर आतंकवादी कार्य करणारी संस्था’ असे निवेदक राहुल कंवल सातत्याने म्हणत होते. (राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी अहोरात्र झटणार्‍या संस्थेविषयी असे अपशब्द वापरणारी वृत्तवाहिनी समाजाला काय दिशादर्शन करत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक) सनातन संस्थेच्या साधकांनी वाशी येथे बॉम्बस्फोट केल्याचे मान्य केले, असे या कार्यक्रमाच्या विज्ञापनात दाखवण्यात आले. (न्यायालयापेक्षा स्वत:ला शहाणी समजणारी वृत्तवाहिनी! – संपादक)

या कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, निखील वागळे आणि अभय नेवगी सहभागी झाले होते.

मोडतोड केलेले चित्रीकरण, हा पुरावा होऊ शकत नाही ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वाशी प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. तुम्ही दाखवत आसलेले चित्रीकरण संपूर्णपणे दाखवण्यात आलेले नाही. ही चित्रफीत मोडतोड करून दाखवण्यात येत आहे. त्यामुळे अद्ययावत ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार याचे न्यायालयीन मूल्य शून्य आहे. केवळ अर्धे चित्रीकरण दाखवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आरोपींच्या अधिवक्त्यांनी २ संशयित व्यक्ती आरोपींना सहाय्य करण्याच्या नावाखाली चौकशी करत असल्याची तक्रार शासकीय अधिकार्‍यांकडे केली होती. या प्रकरणाची पोलीस चौकशी झाल्यावरच बोलता येईल.

इंडिया टुडेचे निवेदक राहुल कंवल यांच्याकडून श्री. रमेश शिंदे यांना दमदाटी !

कार्यक्रमाच्या वेळी निवेदक राहुल कंवल हे श्री. रमेश शिंदे यांच्याशी शिष्टाचाराच्या मर्यादा विसरून त्यांच्या अंगावर धावून जात दमदाटी करत होते. (इंडिया टुडेची झुंडशाही ! अशा वृत्तीच्या पत्रकारांचा भरणा असलेली वृत्तवाहिनी म्हणजे पत्रकारितेला लागलेला कलंक ! – संपादक) श्री. शिंदे यांच्याशी डोळे वटारत मोठ्याने बोलून आरडाओरड करत होते. ‘आमच्यामुळे हुरियत कॉन्फरन्स’चे ७ जण कारागृहात आहेत, आम्ही तुम्हालाही कारागृहात पाठवू’, असे म्हणत श्री. शिंदे यांच्यावर दबाव आणत होते.

इंडिया टुडेचा खोटारडेपणा !

या कार्यक्रमासाठी श्री. रमेश शिंदे यांना निमंत्रण देतांना ‘मुंबई येथे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा सत्कार होत असल्याने त्याविषयी चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी यावे’, असे म्हटले होते; मात्र श्री. शिंदे स्टुडिओमध्ये पोहोचल्यावर स्टिंग ऑपरेशनचा कार्यक्रम चालू करण्यात आला. (याचा अर्थ श्री. शिंदे यांना कोणतीही सिद्धता करता येऊ नये आणि त्यांना कात्रीत पकडता यावे, असा वृत्तवाहिनीचा कुटील हेतू यातून दिसून येतो ! हिंदुत्वनिष्ठांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न होय ! – संपादक) या विषयी श्री. शिंदे यांनी कार्यक्रमातून थेट सांगितल्यावर निवेदक कंवल भडकले आणि मोठा आरडाओरड करत विषयाला बगल दिली. (सूत्र स्वतःच्या अंगावर आल्यावर पळ काढणारे सूत्रसंचालक ! – संपादक)

नव्या माहितीविषयी चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल ! – गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

कोणत्याही संस्थेवर थेट बंदी घालण्यात येत नाही. त्यासाठी प्रक्रिया करावी लागते. ‘इंडिया टुडे’ने नव्याने दिलेल्या माहितीची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात र्यईल. (सनातनची अपकीर्ती करणार्‍या या वृत्तवाहिनीविषयी सनातन कायदेशीर सल्ला घेत आहे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF