हिंदु आतंकवादाचा बुरखा फाडणारे झुंजार अधिवक्ता संजीव पुनाळेकर ! – अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, संस्थापक सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता पुनाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु विधीज्ञ परिषद भक्कमपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहे. हिंदुत्वाची बाजू मांडणारे झुंजार अधिवक्ता यांना यापूर्वी गोपीनाथपंत बोकील पुरस्कार मिळाला आहे. (छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाशी बोलणी करायला त्यांना अधिवक्ता म्हणून पाठवले होते. त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे.) ८ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पत्रकार मंचाच्या वतीने अधिवक्ता पुनाळेकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. हिंदुत्वनिष्ठांकडून आत्मीयतेने करण्यात येत असलेला सत्कार यावरून अधिवक्ता पुनाळेकर यांच्याकडून होत असलेले हिंदुत्वाचे कार्य लक्षात येते. या लेखाद्वारे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदु समाजासाठी दिलेले योगदान थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

गुन्ह्यात अडकवण्यात आलेल्या हिंदूंना प्रतिष्ठा मिळवून देणे

ठाणे येथील गडकरी रंगायतन येथील बॉम्बस्फोटाच्या खटल्याच्या वेळी माझा संजीव पुनाळेकर यांच्याशी परिचय झाला. या खटल्यामध्ये तत्कालीन काँग्रेस शासनाने हिंदुत्वनिष्ठांना नाहक गोवले होते. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी प्रखर बुद्धीमत्ता आणि  हिंदुत्वाविषयी असलेली तळमळ यांमुळे या खटल्यातील ४ हिंदुत्वनिष्ठांचे निर्दोषत्व सिद्ध केले. तसेच गोवा येथील मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काँग्रेस शासनाने ६ निरपराध हिंदुत्वनिष्ठांना नाहक गोवले; मात्र काँग्रेस सरकारचा हा कुटील डाव अधिवक्ता पुनाळेकर यांचे प्रयत्न आणि तळमळ यांमुळे उधळून लावला गेला. माननीय न्यायालयाने सर्व ६ आरोपींना निर्दोष सोडले आणि या प्रकरणी गृहमंत्रालय, सरकार, आतंकवादी विरोधी पथक यांवर ताशेरे ओढले. या खटल्यांतून निर्दोष मुक्तता करून अधिवक्ता पुनाळेकर यांनी त्यांना निरपराध हिंदूंना प्रतिष्ठा आणि मानसन्मान मिळवून दिला.

न्यायालयात काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेषी चेहरा उघड करणे

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात निरापराध लष्करी अधिकार्‍यांना विनाकारण गोवणार्‍या काँग्रेस शासनाचा हिंदुद्वेष अधिवक्ता पुनाळेकर यांनी न्यायालयात उघड केला. या खटल्याविषयी त्यांनी अनेक लेख लिहिले, पत्रकार परिषद घेतल्या. सहकारी श्री. विक्रम भावे यांना अधिवक्ता पुनाळेकर यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हा ग्रंथ लिहून तत्कालीन काँग्रेस शासनाने निर्माण केलेला भगवा आतंकवादाचा बुरखा फाडला.

हिंदुत्वनिष्ठांसाठी तत्परतेने धावून येणारा अधिवक्ता

स्वयंघोषित पुरोगामी दाभोलकर आणि कॉ. पानसरे या खटल्यातही निरपराध हिंदूंना  अडकवले गेले. दाभोलकर, पानसरे खून खटल्यांमध्ये आरोपींसाठी आवश्यक ते न्यायालयीन साहाय्य करणे, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ती न्यायालयीन साहाय्य करणे, जामीन मिळवून देणे, अशा प्रकारे अधिवक्ता पुनाळेकर हिंदुत्वनिष्ठांना साहाय्य करत आहेत. सध्या बहुचर्चित असलेल्या नालासोपारा कथित शस्त्रास्त्र प्रकरणात अडकवलेल्या हिंदुत्वनिष्ठांसाठी अधिवक्ता पुनाळेकर यांनी विविध ठिकाणी जाऊन युक्तीवाद केला. याविषयी सरकारला नोटीसा पाठवून, पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाची बाजू समर्थपणे मांडली.

जनहित याचिकेद्वारे हिंदुहितासाठी लढा देणारा अधिवक्ता

हे सर्व करत असतांना अधिवक्ता पुनाळेकर यांनी अनेक जनहित याचिका चालवल्या. यामध्ये गोवा येथील मुसलमानांनी अतिक्रमण केलेल्या मोती डोंगर रिकामा करण्याचा आदेश न्यायालयाकडून प्राप्त केला. मुंबई येथील आझाद मैदानावर मुसलमानांनी घातलेल्या हैदोसाविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ठ केली. यामुळे या मोर्चाचे संयोजक, आयोजक यांना न्यायालयाने दंड ठोठावला. मशिदीवरून ५ वेळा कर्णकर्कश आवाजात वाजवण्यात येणारे भोंगे बंद करण्याचा आदेश जनहित याचिकेद्वारे मिळवला.

हिंदु धर्मजागृती सभांतून हिंदुत्वाची बाजू प्रखरपणे मांडणे

हे सर्व सांभाळून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभांमध्ये अधिवक्ता पुनाळेकर यांनी एक खर्डा वक्ता म्हणून हिंदूंना संबोधित केले. या सभांच्या माध्यमातून त्यांनी हिंदुत्वाची बाजू समाजापुढे ठामपणे मांडली.

वृत्तवाहिन्यांवर समर्थपणे हिंदूंची बाजू मांडणे

आज अनेक हिंदुत्वाविषयी प्रश्‍न उपस्थित झाल्यास अनेक वृत्तवाहिन्यांकडून अधिवक्ता पुनाळेकर यांना आवर्जून बोलावण्यात येते. वृत्तवाहिन्यांवरील या चर्चांमध्ये अधिवक्ता पुनाळेकर हिंदुत्वाची बाजू समर्थपणे मांडत आहेत.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर, तसेच अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर ‘पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्कारा’ने सन्मानित !

डावीकडून अधिवक्ता देवदास शिंदे, श्रीमती विजयाताई भोसले, सत्कार करतांना श्री. अभय वर्तक, सत्कार स्वीकारतांना अधिवक्ता संजीव पुनाळेकर
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार करतांना १. श्रीमंत शिवाजीराजे भोसले महाराज

वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षी शिवप्रतापदिन साजरा केला जातो, तसेच त्या निमित्ताने पुरस्कारही दिले जातात. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्कार’ शिवप्रताप दिनाच्या दिवशी म्हणजे १८ डिसेंबर २०१६ ला प्रदान करण्यात आला.

या वेळी सर्वश्री अधिवक्ता देवदास शिंदे, श्रीमती विजयाताई भोसले, श्री. बाबूजी नाटेकर, सनातनचे श्री. अभय वर्तक, श्री. सतीशकुमार प्रधान हे व्यासपिठावर उपस्थित होते. हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ६ डिसेंबर २०१७ ला प्रदान करण्यात आला.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वाविषयी वेळोवेळी मांडलेले प्रखर विचार आणि ठाम भूमिका नेहमीच हिंदू समाजासाठी दिशादर्शक ठरली आहे. अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कायदेशीर लढा देऊन निरपराध हिंदूंना दिलासा मिळवून दिला आहे. त्यामुळे हिंदु धर्मप्रेमी अधिवक्ता पुनाळेकर यांचे शतश: ऋणी आहेत. हिंदूहितासाठी लढा देणार्‍या अशा झुंजार अधिवक्त्याचा यथोचित सत्कार होणे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या अधिवक्त्यांसाठीही प्रेरणादायी आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now