चीनने इंटरपोलच्या अध्यक्षांना चौकशीसाठी कह्यात घेतले

बीजिंग – आंतरराष्ट्रीय पोलीस समूहाचे (इंटरपोलचे) अध्यक्ष मेंग हाँगवेई यांना चीनने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. यापूर्वी ते फ्रान्समधून चीनकडे जात असतांना बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. हाँगकाँग स्थित ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ दैनिकाने हे वृत्त दिले आहे. इंटरपोलचे अध्यक्ष बनणारे मेंग हे पहिले चिनी व्यक्ती आहेत. मेंग हाँगवेई हे चीनमधील सार्वजनिक सुरक्षेचे उपमंत्री होते. मेंग यांना त्यांच्या विरोधातील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी चीनच्या शिस्तपालन समितीने कह्यात घेतले आहे. त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे ? कुठे त्यांची चौकशी चालू आहे ? याविषयी माहिती मिळू शकलेली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now