मिदनापूर (बंगाल) येथे पोलिसांवर बॉम्ब फेकून त्यांच्या कह्यातून दोघा आरोपींचे पलायन

  • बंगालमध्ये फटाक्यांप्रमाणे बॉम्बचा वापर केला जातो, हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती पहाता केंद्र सरकारने राज्य सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवटच लावणे आवश्यक आहे !                                                                                            
  • महाराष्ट्रात निरपराध हिंदुत्वनिष्ठांना कथित बॉम्ब बनवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आल्यावर त्यांना आतंकवादी ठरवणारे पुरो(अधो)गामी बंगालमधील अशा घटनांविषयी नेहमीच मौन बाळगून त्यांचे ढोंगी पुरोगामित्व दाखवून देतात !

मिदनापूर (बंगाल) – येथे ३ आरोपींनी पोलिसांच्या कह्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतांना पोलिसांवर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रयत्नात तिघेही पळून गेले; मात्र नंतर एकाला पोलिसांनी परत अटक केली. पोलीस या तिघांना न्यायालयात उपस्थित करण्यासाठी घेऊन जात होते. त्या वेळी ही घटना घडली. तिघेही दुचाकीवरून पळण्याचा प्रयत्न करत होते. (पोलिसांच्या कह्यात असणार्‍या आणि नंतर न्यायालयात नेण्यात येणार्‍या आरोपींकडे बॉम्ब कुठून आले ? त्यांना लगेच दुचाकी कशी उपलब्ध झाली ? या प्रश्‍नांची उत्तरे पोलिसांनी दिली पाहिजेत ! – संपादक) त्या वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी बॉम्ब फेकले; मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now