स्थानिकांकडून उत्तर भारतियांना गुजरात सोडण्याची धमकी

गुजरातमध्ये १४ मासांच्या मुलीवर उत्तर भारतियाकडून बलात्कार

  • बलात्कार्‍यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याने जनतेमध्ये असा असंतोष निर्माण होत आहे आणि याला शासनकर्ते अन् जनताही तितकीच उत्तरदायी आहे !                        
  • काही राज्यांतील लोक अन्य राज्यांत जाऊन गुन्हेगारी कारवाया करतात. यावरून देशातील अनेक राज्यांत त्या राज्यांतील सर्वच लोकांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातो, याविषयी संबंधित राज्यांनी आता विचार करायला हवा !

कर्णावती – येथे २८ सप्टेंबर या दिवशी १४ मासांच्या मुलीवर बिहारच्या एका मजुराने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात स्थानिक गुजराती लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आंदोलकांकडून उत्तर भारतियांना लक्ष्य करण्यासह त्यांना गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यावर आक्रमणेही करण्यात येत आहेत. या प्रकरणी दोन गुन्हेही नोंद करण्यात आले आहेत. २३ वर्षांचा उत्तर भारतीय ऑटोरिक्शा चालक असलेल्या केदारनाथ याच्यावर २५ जणांच्या जमावाने चांदलोडिया पुलावर आक्रमण केले. ‘बाहेरच्या लोकांनी गुजरात सोडावे’, ‘गुजराती जनतेला वाचवण्याची आवश्यकता आहे’, अशा घोषणा जमाव देत होता, अशी माहिती केदारनाथ याने दिली आहे. साबरमती येथे एका उत्तर भारतीय महिलेला पाठलाग करून धमकावण्यात आले. ‘उत्तरप्रदेश आणि बिहार येथील लोकांनी गुजरात सोडून जावे, नाहीतर त्यांना ठार मारण्यात येईल’, अशी धमकीही जमावाने दिली. या प्रकाराची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. राज्यात अन्यत्रही असे प्रकार घडले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now