भाजप सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार !

भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांचा घरचा अहेर !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘स्वच्छ भारत अभियान’ हा सरकारचा एक प्रसिद्धी मिळवण्याचा प्रकार (पब्लिसिटी स्टंट) आहे, अशी टीका भाजपच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी स्वपक्षावर केली आहे. गांधीजयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी झाडू हातात घेण्यास नकार दिला. त्या म्हणाल्या, ‘‘देशात सध्या बेरोजगारी, महागाई यांसारखी अनेक गंभीर सूत्रे आहेत. सरकार अशा मोहिमा गंभीर सूत्रांवरून लक्ष हटवण्यासाठी आयोजित करते. मी एक खासदार आहे. मी केवळ हातात झाडू घेऊन उभी राहिले, तर ही जागा स्वच्छ होणार आहे का ? (हे सूत्र योग्य असले, तर खासदार फुले यांनी त्यांचा मतदारसंघ स्वच्छ ठेवण्यासाठी काय धोरणात्मक उपाययोजना केली, हेही त्यांनी सांगितले पाहिजे ! – संपादक) नुसते छायाचित्र काढण्यासाठी हातात झाडू घेणे मला पटत नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF