वाराणसी येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्यावरून चर्चची तोडफोड

पंतप्रधानांच्या मतदारसंघात हिंदूंचे धर्मांतर करण्याइतपत उद्दाम झालेले ख्रिस्ती मिशनरी ! हिंदूंच्या तीर्थक्षेत्री ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कारवाया रोखू न शकणारी व्यवस्था हिंदूहित काय साधणार ?

वाराणसी – येथे सेंट थॉमस चर्चची तोडफोड केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४० अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पाद्री एन्. स्टीव्हन यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. चर्चमधील आनंद नावाच्या पाद्य्राने २० सहस्र रुपयांचे आमीष दाखवून एका हिंदूचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यावर संतप्त झालेल्या धर्माभिमान्यांनी चर्चवर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. (बलपूर्वक किंवा आमीष दाखवून धर्मांतर करणे हा गुन्हा असतांना ख्रिस्ती मिशनरींकडून सातत्याने हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे आणि भाजपसहित सर्व राजकीय पक्ष यांकडे कानाडोळा करत आहेत. यामुळे जनतेच्या भावनांचा उद्रेक होणे, यास भाजप सरकारच उत्तरदायी आहे, हे निश्‍चित ! – संपादक) वाराणसीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मप्रसार चालू आहे. येथील १२२ भागांमध्ये क्रॉस लावण्यात आले आहेत. (इतके होईपर्यंत तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना काय करत होत्या ? आणि आताही त्या याविरोधात काय करत आहेत ? – संपादक)

या तोडफोडीविषयी आरोप असणार्‍या येथील हिंदु युवा शक्ती संघटनेने म्हटले आहे की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही; मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमचे आदर्श आहेत. आमची संघटना १५ दिवसांमध्ये वाराणसीमधील १ लाख ३५ सहस्र धर्मांतरित हिंदूंना परत हिंदु धर्मात आणणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF