भाजप सरकारच्या काळात खासदारांच्या वेतन आणि भत्ते यांवर १ सहस्र ९९७ कोटी रुपये खर्च

भाजपच्या राज्यात केवळ खासदारांचेच ‘अच्छे दिन’ आलेत आणि जनता ‘दीन’च राहिली आहे !

लोकशाहीत लोकांचे प्रतिनिधी लोकांऐवजी स्वतःसाठीच अधिक प्रयत्न करतात, असेच म्हणावे लागेल !

नवी देहली – केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून आतापर्यंत खासदारांचे वेतन आणि भत्ते यांसाठी १ सहस्र ९९७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहितीच्या अधिकारातून चंद्रशेखर गौड यांनी ही माहिती मिळवली आहे. या माहितीवर अद्याप कुठल्याही खासदाराने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

१. लोकसभा सचिवालयाने चंद्रशेखर गौड यांच्या अर्जावर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, लोकसभेच्या एका सदस्यासाठी सरासरी ७१ लाख २९ सहस्र रुपये खर्च केले गेले, तर राज्यसभेच्या एका सदस्यासाठी सरासरी ४४ लाख ३३ सहस्र रुपये खर्च करण्यात आले.

२. लोकसभेत एकूण ५४५ सदस्य (जनतेतून निवडून आलेले ५४३ सदस्य आणि राष्ट्रपतींद्वारे नामांकित अँग्लो-इंडियन १ सदस्य) आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत.

३. याविषयी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म’चे संस्थापक सदस्य जगीश छोकर म्हणाले की, खासदारांच्या वेतन आणि सुविधा यांवर होणार्‍या खर्चावर विचार व्हायला हवा. खासदारांचे वेतन आणखी १० टक्क्यांनी वाढले, तरी काहीच अडचण नाही; मात्र सरकारी परिवहन, घर, वाहन, भोजन, विमान प्रवास, दूरभाष आणि अन्य भत्ते मिळू नयेत.


Multi Language |Offline reading | PDF