बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि फोरमचे पदाधिकारी यांना अटक व्हावी !

दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती कचरा वाहतुकीच्या वाहनातून कचरा डेपोमध्ये नेल्याचे प्रकरण

बारामती बंदच्या वेळी गणेशोत्सव मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी

बारामती (जिल्हा पुणे) – येथील गणेशोत्सव मंडळांच्या आणि घरगुती श्री गणेशमूर्ती घेऊन त्याचे विधिवत विसर्जन न करता नगर परिषदेने त्या कचरा डेपो परिसरात टाकून देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी येथील गणेशोत्सव मंडळे, गणेश भक्त यांनी ‘बारामती बंद’ची हाक देण्यात आली होती, तसेच या वेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका येथे निवेदनही देण्यात आले. या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये प्रामुख्याने ‘बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि फोरमचे पदाधिकारी यांना अटक व्हावी !’, अशी मागणी करण्यात  आली. या वेळी भाजपचे नेते प्रशांत सातव, बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोककाका देशमुख, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, गणेश मंडळाचे अध्यक्ष नीलेश धालपे, तसेच अधिवक्ता राजेंद्र काळे, अधिवक्ता सुधीर पाटसकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश जाधव, सौ. सुधा घाटगे, सौ. सिंधु कुंभार यांसह मोठ्या संख्येने गणेश भक्त आणि गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF