श्रीलंका येथे ‘एस्एस्आरएफ’च्या वतीने जिज्ञासूंसाठी सत्संग

श्रीलंका – ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (‘एस्एस्आरएफ’च्या) साधिका कु. मिथुना यांच्या श्रीलंका येथील निवासस्थानी २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी जिज्ञासूंसाठी सत्संग घेण्यात आला. कु. मिथुना यांच्या मातोश्रींनी या सत्संगाचे आयोजन केले होते. या सत्संगात सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित जिज्ञासूंनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच ‘सामाजिक प्रसारमाध्यमांची उपयुक्तता’, ‘अनेकांतून एकात जाण्याचे महत्त्व’ यांविषयीची माहिती जाणून घेतली. काहींनी त्यांच्या अनुभूती सांगितल्या.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now