सोलापूर येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. वर्षा वैद्य प्रथम क्रमांकाने सन्मानित

गौरी-गणपति समोरील नाविन्यपूर्ण सजावटीतून दिला ‘औषधी वनस्पतींची लागवड करा’, असा संदेश !

सौ. वर्षा वैद्य यांच्या घरातील गौरी-गणपति समोर केलेली सजावट

सोलापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. वर्षा वैद्य यांनी गणेशोत्सवाच्या काळात गौरी-गणपति समोर ‘औषधी वनस्पतींची लागवड करा’, असा संदेश देत औषधी वनस्पतींची आकर्षक सजावट करून वनस्पतींचे आयुर्वेदिक महत्त्व सांगणारा माहिती फलकही लावला होता. या आकर्षक आणि नाविन्यपूर्ण सजावटीला ‘ब्राम्हण बिझनेस नेटवर्क सोलापूर’ या संस्थेच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला. या स्पर्धेत एकूण ६३ महिला सहभागी झाल्या होत्या.

कामतकर अ‍ॅकॅडमी येथे ३० सप्टेंबर या दिवशी ‘ब्राम्हण बिझनेस नेटवर्क सोलापूर’ या संस्थेची बैठक पार पडली. या बैठकीत हा सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक घोषित केल्यावर सौ. वर्षा वैद्य यांनी ‘हे सर्व यश परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या कृपेनेच मिळाले आहे. त्यांनीच सर्व सुचवले आणि करून घेतले’, असे सांगितले.

क्षणचित्र : ही सजावट पाहून समाजातील लोकांनी सनातनच्या ‘औषधी वनस्पतींची लागवड करा’ या ग्रंथाची मागणी केली.


Multi Language |Offline reading | PDF