(म्हणे) ‘आमचा शांततेवर विश्‍वास असला, तरी देशाच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही !’ – पंतप्रधान मोदी

देशाच्या सन्मानासाठी तडजोड न करण्यासाठीच पाकला नष्ट करणे आवश्यक आहे. पाक महंमद घोरीप्रमाणे भारतावर आक्रमण करत आहे आणि भारत पृथ्वीराज चौहान यांच्याप्रमाणे त्याला सोडून देत आहे. एकदिवस पाक भारताचा घात केल्याविना रहाणार नाही, हे आताच्या शासनकर्त्यांना कधी कळणार ?

नवी देहली –  गेल्या काही दिवसांत आतंकवाद्यांशी आणि पाकच्या सैन्याशी लढतांना भारताचे अनेक सैनिक हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आम्ही स्वतःहून कधीही आक्रमण केले नाही; कारण आम्ही शांततेवर विश्‍वास ठेवतो; (याला शांतता म्हणत नाहीत, तर नेभळटपणा म्हणतात ! छत्रपती शिवाजी महाराजांनी असा नेभळटपणा केला नाही; म्हणून ते हिंदु राष्ट्र स्थापन करू शकले आणि आता भारतात हिंदूंना अवमानित व्हावे लागत आहे ! – संपादक) मात्र असे असले, तरी देशाच्या सन्मानाशी आणि सैनिकांच्या बलीदानाशी कधीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक कार्यक्रमात केले. (सैनिकांच्या बलीदानाविषयी इतकाच कळवळा असता, तर एव्हाना पाक जगाच्या नकाशावरून कधीच नष्ट झाला असता ! – संपादक) ‘वर्ष २०१६ मध्ये झालेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या वेळीही आपल्या सैनिकांनी त्यांची कामगिरी योग्य प्रकारे केली’, असेही मोदी म्हणाले. (सैनिक त्यांची कामगिरी चांगलीच करत आले आहेत; मात्र आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी त्यांची कामगिरी चोख न केल्याने पाक गेली ७० वर्षे भारताला डोकेदुखी ठरला आहे, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादक)

हरियाणातील सैनिक प्रतिदिन हुतात्मा होत नसल्यामुळे राज्यातील त्यांच्यासाठीचा साहाय्यता निधी वाढवून १ कोटी रुपये करणार ! – भाजपचे केंद्रीय मंत्री वीरेंद्र सिंह

‘सैनिक प्रतिदिन हुतात्मा झाले, तर अशी रक्कम सरकार देणार नाही’, असे मंत्र्यांना म्हणायचे आहे का ? सैनिक हुतात्मा होणार नाहीत, यासाठी सरकार काय करणार, हे मंत्री का सांगत नाहीत ?

जिंद (हरियाणा) – राज्यातील सैनिक प्रतिदिन हुतात्मा होत नाहीत. एखाद – दुसरा सैनिक हुतात्मा होत असतो. त्यांच्या नातेवाइकांना देण्यात येणारी ५० लाख रुपयांच्या साहाय्यता निधीत वाढ करून ती १ कोटी रुपये करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे विधान केंद्रीय पोलादमंत्री वीरेंद्र सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केली. यावर येथे उपस्थित हुतात्मा सैनिकांच्या नातेवाइकांनी अप्रसन्नता दर्शवली.

हुतात्मा सैनिकांच्या पत्नींनी सांगितले की, एकीकडे आम्ही आमच्या मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करत आहोत, तर दुसरीकडे मंत्री अशी आक्षेपार्ह विधाने करत आहेत. अशा मंत्र्यांनी स्वतःच्या मुलांना सैन्यात भरती करून त्यांना हुतात्मा करावे. त्यानंतर त्यांना हौतात्म्याचे मूल्य कळेल. जर मंत्री अशी विधाने करत असतील, तर आम्ही हुतात्म्यांसाठीच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही.

हुतात्मा सैनिकांच्या नातेवाइकांना नंतर अनेक संकटांचा सामना करावा लागतो; मात्र सरकार त्यांची कोणतीही नोंद घेत नाही. वर्ष १९८९ मध्ये हुतात्मा झालेले बलबीर यांची पत्नी राजबाला, वर्ष २००० मध्ये हुतात्मा झालेले रमेश यांची पत्नी आदी हुतात्मा सैनिकांच्या पत्नींनी या वेळी टीका केली.

पाकिस्तानी हेलिकॉप्टरची भारतीय सीमेमध्ये घुसखोरी

जम्मू – पाकिस्तानच्या एका हेलिकॉप्टरने भारतीय हवाई सीमेमध्ये घुसखोरी केल्याने भारतीय सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केल्यानंतर ते माघारी गेल्याची घटना घडली आहे. पुंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमधील नियंत्रणरेषेवर दुपारी साडेबाराच्या सुमारस ही घटना घडली. हे हेलिकॉप्टर टेहाळणी करण्याच्या उद्देशातून आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे चित्रीकरण करण्यात आले असून त्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. यात हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान फारूक हैदर हे होते आणि नंतर ते परत पाकव्याप्त काश्मीरमधील कहुटा येथे जाऊन उतरले.


Multi Language |Offline reading | PDF