पाकिस्तान आतंकवाद्यांचा गौरव करतो ! – परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची संयुक्त राष्ट्रात टीका

पाक आतंकवाद्यांचा गौरव करतो आणि भारताची हानी करतो, तर भारत पाकला अन् आतंकवाद्यांना नष्ट का करत नाही ?

न्यूयॉर्क – आज आतंकवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून आतंकवादाची झळ सोसत आहे. (याला नेभळट आणि गांधीगिरी करणारे भारतीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! – संपादक) महत्त्वाचे म्हणजे आतंकवादाचे हे आव्हान कुठल्या दूरच्या देशामुळे नव्हे, तर शेजारी देश पाकिस्तानमुळे निर्माण झाले आहे. हा देश आतंकवाद पसरवण्यातच नव्हे, तर आतंकवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही हुशार आहे, अशी टीका भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानवर केली.

सुषमा स्वराज यांनी मांडलेली सूत्रे

१. अमेरिकेवर ९/११ चे आक्रमण करणारा ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू होता. अमेरिकेने त्याच्या सैन्यक्षमतेच्या बळावर पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले. (भारत अमेरिकेप्रमाणे सैन्यक्षमतेनुसार कृती का करत नाही, हे सुषमा स्वराज भारतियांना सांगतील का ? – संपादक); पण हे सत्य समोर आल्यानंतर ‘आपण काही गुन्हा केला आहे’, असे पाकिस्तानला वाटत नव्हते. (हे ठाऊक असूनही भारत अजूनही पाकच्या संदर्भात नेभळट भूमिका घेतो ! – संपादक) अजूनही तसेच चालू आहे.

२. ९/११चा मास्टरमाईंड मारला गेला; पण मुंबईत २६/११ चे आक्रमण घडवणारा हाफिज सईद पाकिस्तानात मोकळा फिरत आहे. (कारण भारत अमेरिकेप्रमाणे धाडस दाखवत नाही, ही वस्तूस्थिती आहे. त्यासाठी पाकवर टीका करून काहीही साध्य होणार नाही ! – संपादक) तिथे सभा आणि मोर्चे काढून भारताला धमकी देत आहे. या सगळ्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा खरा तोंडवळा आता जगासमोर आला आहे. (पाकचा खरा तोंडवळा जगाला केव्हाच ठाऊक झाला आहे; मात्र भारत अनेक वर्षे तेच तेच सांगून काय साध्य करत आहे ? यातून स्वतःची निष्क्रीयता झाकण्याचाच प्रयत्न भारत करत आहे ! – संपादक) 

३. ‘आमच्याकडून चर्चेमध्ये अडथळा आणला जातो’, असा आरोप नेहमी पाकिस्तानकडून केला जातो; पण हे पूर्णपणे खोटे आहे. कुठलाही जटील प्रश्‍न, वाद चर्चेने सुटतो, यावर आमचा विश्‍वास आहे. (असे म्हणणारे भाजपवाले कधीही पाकचा नायनाट करू शकत नाहीत, हे स्पष्ट आहे ! – संपादक)

४. अनेकदा पाकिस्तानसमवेत चर्चा करण्याचा प्रयत्न केला; पण ही चर्चा रहित झाली असेल, तर त्याला पाकिस्तानचे वर्तन उत्तरदायी आहे. (काँग्रेसप्रमाणे पाकशी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त करणारे भाजप सरकार ! – संपादक)

५. मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने भारताकडून मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे, असे दर्शवणारे एक छायाचित्र दाखवले होते; पण हे छायाचित्र दुसर्‍याच कुठल्यातरी देशातील होते. पाकिस्तानकडून नेहमीच असे खोटे आरोप केले जातात. तो त्यांच्या प्रचारतंत्राचा भाग आहे. (पाक खोटारडा आहे, हे ठाऊक आहे, तरी चर्चा करण्याचा प्रयत्न का केला जातो ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF