भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे संकेत

  • ‘केवळ एखाद-दुसरे सर्जिकल स्ट्राईक केल्याने आतंकवाद नष्ट होत नसतो’, हे भाजप सरकारला कोण सांगणार अशा एखाद दुसर्‍या कारवाया करून भाजपवाले स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेऊन जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे जनतेने लक्षात घ्यायला हवे !
  • पाकचा संपूर्ण नायनाट केल्याविना भारताला शांतता लाभणार नाही, हे वास्तव आहे !

मुझफ्फरपूर (बिहार) – पाकिस्तानने आपल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकासमवेत कशी क्रूरता केली, हे आपण पाहिले आहे. कदाचित् आपल्याला काही माहिती असेलही. मी आता याविषयी काही सांगणार नाही; मात्र काही तरी झाले आहे. २-३ दिवसांपूर्वी काहीतरी ठीकठाक झाले आहे. काही लोकांना याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत आपल्यालाही याची माहिती कळेल, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात केले. यावरून भारतीय सैन्याने पुन्हा एकदा  सर्जिकल स्ट्राईकसारखी मोठी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तान त्याच्या कारवाया थांबवत नाही. त्यामुळे मी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना सांगितले आहे की, शेजारी देश आहे. त्यामुळे पहिल्यांदा गोळी चालवू नका. जर तिकडून गोळी आली, तर मात्र आपल्या गोळ्या मोजत बसू नका. (काँग्रेसप्रमाणे राष्ट्रघातकी गांधीगिरी करत रहाणारे भाजपवाले कधीतरी आतंकवाद आणि पाक यांचा बीमोड करू शकतील का ? असे शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शासनकर्ते असणारे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करतात ! – संपादक)

२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांचे ४ तळ उद्ध्वस्त केले होते.


Multi Language |Offline reading | PDF