हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे अडथळे दूर व्हावेत, यासाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात कार्तिकेय यज्ञ संपन्न !

कार्तिकेय यज्ञात आहुती देतांना १. वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती २. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, ३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पुरोहित

रामनाथी (गोवा), २९ सप्टेंबर (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे अनिष्ट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत, धर्मकार्यात विघ्ने आणणार्‍या सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे निर्दालन व्हावे आणि साधकांचे त्रास दूर व्हावे, यासाठी येथील सनातनच्या आश्रमात २९ सप्टेंबर या दिवशी कार्तिकेय यज्ञ करण्यात आला. सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाचा संकल्प केला. इरोड, तमिळनाडू येथील वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि सनातनच्या पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी यज्ञविधींचे पौरोहित्य केले. या वेळी सनातनचे सद्गुरु, संत आणि साधक उपस्थित होते.

परोक्ष आणि अपरोक्ष बाधा दूर करण्यासाठी अथर्ववेदामध्ये ‘श्री सुब्रह्मण्य त्रिशती’ सांगण्यात आली आहे. यात देवांचा सेनाधिपती कार्तिकेयाला उद्देशून एकूण तीनशे मंत्र आहेत. त्यानुसार यज्ञाच्या वेळी ‘श्री सुब्रह्मण्य त्रिशती’ मंत्रांचे उच्चारण करत आहुती देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF