बांगलादेशच्या हिंदु क्रिकेटपटूला फेसबूकवरून दुर्गादेवीचे चित्र काढून टाकण्यास धर्मांधांनी बाध्य केले होते !

ढाका – नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशाच्या लीतोन दास या हिंदु क्रिकेटपटूने शतक झळकावले होते. त्यामुळे त्याचे बांगलादेशामध्ये कौतुक केले जात आहे; मात्र याच दास याला वर्ष २०१५ मध्ये त्याने त्याच्या फेसबूक पानावरून त्याच्या चाहत्यांना दुर्गापुजेनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी श्री दुर्गादेवीचे चित्र पोस्ट केले होते, तेव्हा बांगलादेशातील धर्मांधांनी त्याच्यावर टीकेचा भडीमार केला. त्याला फेसबूकवरून दुर्गादेवीचे चित्र काढून टाकण्यावर बाध्य केले होते. (लीतोन दास याने त्याच्या कौशल्याने बांगलादेशास क्रिकेट जगतात प्रसिद्धी मिळवून दिली असली, तरी तो ‘हिंदु’ आहे हे बांगलादेशचे धर्मांध विसरले नाहीत. इस्लाममध्ये मूर्तीपूजा निषिद्ध आहे; म्हणून तो जरी हिंदू असला, तरी त्याने इस्लाम धर्माप्रमाणेच वागले पाहिजे, असेच धर्मांधांना वाटते, हे भारतातील तथाकथित पुरो(अधो)गाम्यांनी लक्षात ठेवायला हवे ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now