कोल्हापूर येथे विविध आकारात साकारलेल्या श्री गणेशमूर्ती आणि त्यातून होणारी विटंबना !

ही छायाचित्रे विटंबना लक्षात यावी, यासाठी प्रसिद्ध करत असून यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. – संपादक

अशा श्री गणेशमूर्तीतून कधीतरी सात्त्विक स्पंदने येतील का ?

पिंपळाच्या झाडात सिद्ध केलेली असात्त्विक गणेशमूर्ती

लोणी खाणारा बाळकृष्ण म्हणजे श्रीकृष्णाची दैवी लीलाच होती. असे असतांना श्रीकृष्णाच्या ठिकाणी गणेशाला दाखवून आणि लोणी चोरून खातांना बालसवंगडी नव्हे, तर वानर अन् उंदीर दाखवून श्रीकृष्णाच्या दैवी लीलेची केलेली ही अवहेलनाच नव्हे का ?

बांधून ठेवलेल्या बाळकृष्ण रूपातील गणेशमूर्ती आणि मडक्यातील लोणी चोरून खातांना वानर अन् उंदीर !

मुलांना श्री गणेशाचे भ्रमणभाषवर खेळणारे रूप दाखवायचे कि विघ्न हरण करून आशीर्वाद देणारा श्री गणेश साकारायचा, हेही न करणारे गणेशोत्सव मंडळ !

‘मोबाईलच्या युगात विसरत चाललेले खेळ’ ही संकल्पना मांडतांना एका मंडळाकडून श्री गणेशाचा वापर भ्रमणभाषवर ल्युडो खेळतांना करण्यात आला.

बालमजुरी रोखण्यासाठीचा संदेश देतांना श्री गणेशाला दाखवणे अशास्त्रीय ! खरेतर बालमजुरी रोखणे हे सरकारचे कर्तव्य असतांना त्यासाठी देवतांचा वापर होणे निंदनीय !

‘बालमजुरी थांबवा’ हा संदेश देण्यासाठी कारखान्यातील दृश्य दाखवून साकारलेली श्री गणेशमूर्ती !


Multi Language |Offline reading | PDF