संस्कृत मंडळांतील सुधारणांऐवजी मदरसा मंडळातील सुधारणांना प्रसारमाध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी

संस्कृतला मृत भाषा म्हणणार्‍या हिंदुद्वेषी नेहरू यांचेच आताची प्रसारमाध्यमे वंशज असल्याने ते याहून वेगळे काय करणार ?

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदरशा आणि संस्कृत विद्यालये यांचे आधुनिकीकरण करण्याची घोषणा केली होती; मात्र प्रसारमाध्यमांना मदरशांविषयी अधिक आस्था असल्याचे दिसून आले. मदरशा मंडळातील सुधारणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दिली. काहींनी त्यावर टीका केली, तर काहींनी स्वागत केले. त्याच वेळेस संस्कृत मंडळाच्या सुधारणांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले.

१. मदरशांमधून पदवीधर झालेल्या युवकांना विमानतळावरील साध्या सूचनाही वाचणे शक्य होत नाही. लाखो मुसलमान विद्यार्थी केवळ सरकारच्या शिष्यवृत्त्या आणि सरकारचा साहाय्यता निधी मिळवण्यासाठी मदरशांमध्ये भरती होतात, असे दिसून आले आहे. तसेच मदरशांमधून पदव्याही सहज प्राप्त होत असल्याने मुसलमान युवक यामध्ये भरती होतात. तसेच आखाती देशांमध्ये जाण्यासाठी या पदव्यांचा वापर केला जातो.

२. उत्तरप्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेच्या शिक्षणपद्धतीमध्ये आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे; मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे.

३. मदरशा आणि संस्कृत मंडळे भाषा अन् धार्मिक पाठ यांचे शिक्षण देतात. मदरशांमध्ये अरबी आणि फारसी भाषा शिकवतात, तर संस्कृत विद्यालयांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते.

४. संस्कृत मंडळाचे पूर्व मध्यमा आणि उत्तर मध्यमा प्रमाणपत्र ‘सीबीएस्ई’च्या अनुक्रमे दहावी आणि बारावी प्रमाणपत्रांच्या समान आहे. मदरशांना ‘एन्सीईआर्टी’ची पाठ्यपुस्तके लागू करण्याविषयी सांगितले जात आहे. तसेच संस्कृत विद्यालयांनाही सांगितले जात आहे.

५. वर्ष २००१ मध्ये संस्कृत मंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच योगी आदित्यनाथ सरकारने मंडळातील सर्व २८ सदस्यांची नियुक्ती केली आहे. संस्कृत मंडळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले  होते. केवळ ६ – ७ सदस्यांसह हे मंडळ कार्यरत होते. १६ वर्षांमध्ये प्रथमच मंडळाला संपूर्ण सदस्यसंख्या प्राप्त झाली आहे.

६. सध्या संस्कृत मंडळाशी १ सहस्र १५१ विद्यालये संलग्न आहेत. यांमध्ये ९७३ विद्यालयांना सरकारी अनुदान मिळते. गेल्या वर्षी या मंडळात ८९ सहस्र विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मदरशांच्या तुलनेत संस्कृत मंडळाचा खर्च जवळजवळ अर्धा म्हणजे २३० कोटी एवढा आहे. प्रथमच संस्कृत मंडळाला स्वत:चे संकेतस्थळही चालू झाले आहे.

७. संस्कृत मंडळाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले होते. संस्कृत ही जतन करण्याची गोष्ट ठरली होती. आता कुठे तरी नवीन संस्कृत शाळा संस्कृत मंडळाशी संलग्न होऊ पहात आहेत, असे संस्कृत मंडळाचे उपसंचालक श्री. कमलेश कुमार यांनी सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now