सातार्‍यात कृत्रिम तळ्याचा भराव खचल्याने विसर्जन मिरवणुका १२ घंटे रखडल्या

सातारा, २६ सप्टेंबर (वार्ता.) – सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी बुधवार नाका ते करंजे रस्त्यावर कृत्रिम तळे खोदण्यात आले होते; मात्र घाईगडबडीत खोदण्यात आलेल्या तळ्याचे काम निकृष्ट प्रतीचे झाले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी बोलावण्यात आलेल्या महाकाय क्रेनचे वजन न पेलल्यामुळे कृत्रिम तलावाचा भराव खचला. तसेच जमिनीखाली पाईपलाईन फुटल्याने सर्वत्र चिखल झाला. यामुळे २३ सप्टेंबर या दिवशी पहाटे ३.३० वाजता गणेशमूर्ती विसर्जन थांबवण्यात आले. यामुळे गणेशमूर्ती विसर्जनासाठी पुष्कळ मोठ्या रांगा लागल्या. पुढे साधारणतः १२ घंटे विसर्जन मिरवणुका रखडल्या. (प्रतिवषीर्र्प्रमाणे यावर्षीही कृत्रिम तलावाचा फार्स करून सातारा नगरपालिकेने सातारावासियांचे ६० लक्ष रुपयांचा चुराडा केला आहे. कृत्रिम तळ्याला सातारावासियांचा प्रखर विरोध असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. – संपादक)

विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी नाहीच !

न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी डॉल्बीला बंदी केली होती. जिल्ह्यातील सर्वच डॉल्बी जागेवर ‘सिल’ करण्यात आल्या होत्या; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या पावित्र्यामुळे डॉल्बी वाजेल कि काय अशी शक्यता होती; परंतु पोलिसांनी केलेल्या नियोजनामुळे विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी वाजली नाही.


Multi Language |Offline reading | PDF