भादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांची सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट !

पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांना सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती सांगतांना श्री. सागर निंबाळकर

रामनाथी (गोवा) – भादरा (हनुमानगढ, राजस्थान) येथील अखिल भारतवर्षिय धर्मसंघ एवं करपात्री फाऊंडेशनचे उत्तराधिकारी पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांनी २५ सप्टेंबर या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते श्री करपात्री स्वामी यांच्या गुरुपरंपरेतील आहेत. आश्रमातील श्री. सागर निंबाळकर यांनी पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांना आश्रम दाखवला, तसेच आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी अवगत केले. पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांचे सनातनच्या कार्याला नेहमीच आशीर्वाद असतात. त्यांच्या संघटनेच्या वतीने होणार्‍या कार्यक्रमांच्या ठिकाणी सनातनला ग्रंथप्रदर्शन लावण्यास अनुमतीही देतात. इतकेच नव्हे, तर त्यांच्याकडे येणार्‍या भक्तांना ते सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे महत्त्वही सांगतात.

सनातन संस्थेचे कार्य सद्यःस्थितीत अत्यावश्यक !

या वेळी पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज म्हणाले, सध्याची तरुण पिढी हिंदु संस्कृतीपासून भरकटली आहे. ती सोळा संस्कार, धार्मिक विधी आदी नाकारत आहे. अशा वेळी सनातन संस्थेने धर्मशिक्षणाच्या माध्यमातून चालवलेले कार्य अद्भूत असून ते अत्यावश्यक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now