गणेशमूर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक

पुणे – कासेवाडीमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या काळात ट्रॅक्टरचालक, साऊंड मालक यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी, तसेच गणेशमूर्तीच्या दिशेने चप्पल, बूट आणि दगड भिरकावून मूर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि अन्य १५ जण यांना अटक करण्यात आली आहे. युवराज अडसूळ यांनी या प्रकरणी तक्रार दिली. राजीव गांधी पतसंस्थेच्या येथे अशोक तरुण मंडळाचा गणपती विसर्जनासाठी जात असतांना बागवे यांनी ट्रॅक्टर चालक आणि साउंड मालक यांना ‘मारा, ओढा रे, सोडू नका’, अशी चिथावणी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. (या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांना काय म्हणायचे आहे ? कार्यकर्त्यांनी गणेशमूर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी काँग्रेस पक्षावर बंदी का नको ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF