नेते आणि राज्यकर्ते सैनिकांचे हौतात्म्य ४ दिवसांत विसरतात ! – हुतात्मा सैनिक हेमराज याच्या भावाचे दुःख

असे असतांनाही सैनिक देशासाठी प्राणत्याग करतात, यातून त्यांची देशभक्ती किती दृढ आहे, हे लक्षात येते ! अशा सैनिकांचा योग्य सन्मान करण्यासाठी लोकशाहीतील शासनकर्ते नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शासनकर्ते असणारे हिंदु राष्ट्र हवे !

मथुरा – पाकिस्तानी ‘बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’(बॅट)कडून जानेवारी २०१३ मध्ये भारतीय सैनिक हेमराज यांची हत्या करून त्यांचे शिर कापून नेले होते. नुकतेच याच ‘बॅट’कडून सीमेवर सीमा सुरक्षा दलाचे सैनिक नरेंद्र सिंह यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. यानंतर हेमराज यांचा परिवार संतप्त झाला आहे. हेमराज यांचे भाऊ जयवीर यांनी म्हटले की, सरकार आणि प्रशासन ४ दिवसांनंतर हुतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विसरून जाते. नंतर कोणीही साहाय्य करत नाही. सरकारकडून परिवाराला विविध सुविधा आणि साहाय्य देण्याच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात काहीही दिले जात नाही. (असे सरकार आणि प्रशासन देणारी लोकशाही म्हणूनच निरर्थक ठरली आहे ! – संपादक)

हुतात्म्यांच्या परिवाराला घोषित केलेले साहाय्यही न करणारी काँग्रेस आणि भाजप !

जयवीर यांनी म्हटले की, हेमराज यांच्या हौतात्म्यानंतर सरकारने त्यांच्या परिवाराला पेट्रोलपंप देण्याची आणि त्यांचे स्मारक बनवण्याची घोषणा केली होती; मात्र ५ वर्षांनंतरही काही मिळालेले नाही. या ५ वर्षांत देहलीमध्ये जाऊन मंत्र्यांच्या कार्यालयात चकरा मारत आहे.

‘पाकच्या सैनिकांची १० शिरे आणा’, अशी तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागणी करणारे भाजपवाले आता सत्तेत असूनही निष्क्रीयच !

जयवीर पुढे म्हणाले की, हेमराज यांच्या हौतात्म्यानंतर अनेक नेते आमच्या घरी आले आणि एका शिराच्या बदल्यात १० शिर आणण्याची तेव्हाच्या सरकारकडे मागणी केली. आज हेच नेते सत्तेत आहेत. हे नेते १० शिर काय आणणार ? ते हौतात्म्यांच्या परिवारांना त्यांचा अधिकारही देत नाहीत.


Multi Language |Offline reading | PDF