गुजरातमध्ये ३० टक्के घरांमध्ये शौचालयांची व्यवस्था नाही ! – कॅग

  • अशा प्रकारचा खोटारडेपणा करणार्‍या राज्यात भाजपची सत्ता आहे, हे भाजपला लज्जास्पद !
  • गुजरात ‘उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त’ असणारे राज्य असल्याचा दावा खोटा असल्याचे उघड !

गांधीनगर (गुजरात) – गुजरात राज्याला ‘उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त असणारे राज्य’ घोषित करण्याचा केंद्र सरकारचा दावा अयोग्य असल्याचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) यांनी म्हटले आहे. अनेक गावांमध्ये अजूनही घरांमध्ये शौचालय नाही. राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १२० गावांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे ३० टक्के घरांमध्ये शौचालय नसल्याचे समोर आले, असे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल राज्य विधानसभेत नुकताच सादर करण्यात आला. केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत गेल्या फेब्रुवारी मासात देशातील ११ राज्यांना ‘उघड्यावर शौचाला जाण्यापासून मुक्त’ असणारी राज्ये घोषित केले होते.

१. हे सर्वेक्षण दाहोद, बनासकांठा, छोटा उदयपूर, डांग, पाटण, वलसाड, जामनगर आणि जुनागड या जिल्ह्यांमध्ये करण्यात आले.

२. ज्या १२० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यामधील ४१ गावांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना‘च्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या शौचालयांचा वापर पाण्याअभावी केला जात नसल्याचे समोर आले आहे.

३. १५ गावांमध्ये पाणी आणि मलनिःसारण व्यवस्था नसल्याने या शौचालयांचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले.

४. आदिवासीबहुल वलसाड जिल्ह्यातील कपराडा तालुक्यातील १७ सहस्र ४०० हून अधिक शौचालयांचा वापर करण्यात येत नसल्याचेही लक्षात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now