पाकिस्तान अजूनही आतंकवाद्यांसाठी स्वर्ग ! – अमेरिका

पाकिस्तानला आतंकवाद्यांसाठी स्वर्ग करण्यात अमेरिकेचा मोठा हात आहे आणि आता या आतंकवाद्यांकडून अमेरिकेच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयत्न होत असल्याने अमेरिका आता अशा प्रकारची विधाने करू लागली आहे ! अमेरिकेला खरेच जर या आतंकवाद्यांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा असेल, तर ती त्यासाठी कृती का करत नाही ?

वॉशिंग्टन – पाकिस्तान अजूनही आतंकवाद्यांसाठी स्वर्ग आहे, असे अमेरिकेचा वार्षिक अहवाल ‘कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम २०१७’ यामध्ये म्हटले आहे. पाकमध्ये असणारे आतंकवादी सुरक्षित असतात. पाकने जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या आतंकवादी संघटनांवर योग्य कारवाई न केल्याने ते भारतावर सातत्याने आक्रमणे करत आहेत, असे यात म्हटले आहे.

१. पाक सरकार या आतंकवादी संघटनांना उघडपणे पैसे गोळा करणे, आतंकवाद्यांची भरती करणे, त्यांच्यासाठी प्रशिक्षण केंद्रे चालवणे यांवर बंदी घालण्यास यशस्वी ठरलेले नाही, असे या अहवालात म्हटले आहे.

२. पाकचे सैन्य पूर्वीच्या तुलनेत अधिक शक्तीशाली झाले आहे. पाक सरकारने सैन्याच्या न्यायालयांना २ वर्षांची मुदत वाढ दिली आहे; मात्र लोकांकडून याचा विरोध होत आहे. ही न्यायालये पारदर्शक नाहीत. त्यांचा वापर नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now