बलात्काराच्या घटनांत वाढ झाल्याने नेपाळ सरकार अश्‍लील संकेतस्थळांवर बंदी घालणार !

लहानसा नेपाळ अशा घटना रोखण्यासाठी कृतीशील होतो, तर बलाढ्य भारत अद्यापही निष्क्रीय रहातो !

काठमांडू (नेपाळ) – मागच्या काही मासांत नेपाळमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने अश्‍लील चित्रफिती असणार्‍या संकेतस्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लवकरच ही बंदी अंमलात येईल’, असे सरकारने सांगितले. या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती देण्यात आली आहे. नेपाळमध्ये नुकतीच एका शालेय विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. अद्याप पोलीस यंत्रणेला आरोपींना शिक्षा करता आलेली नाही.


Multi Language |Offline reading | PDF