गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी लावण्यात येणार्‍या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास वाढता प्रतिसाद !

दिघी येथे प्रदर्शन पहातांना भाविकांना प्रदर्शन दाखवतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजू गाडे

पुणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाचे औचित्य साधून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठिकठिकाणी लावण्यात येत असलेल्या क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास भाविकांकडून वाढता प्रतिसाद  मिळाला. सांगवी येथे मुळानगर मित्रमंडळ येथे प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनासाठी ६४ धर्मप्रेमी उपस्थित होते. प्रवचनासाठी लहान मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी लहान मुलांना बोधपर गोष्टी सांगण्यात आल्या. येथे क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याच समवेत श्रद्धा असोसिएट्स परांदेनगर, दिघी येथेही क्रांतीकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या वेळी ‘या विषयावर प्रश्‍नमंजुशेचा कार्यक्रम घ्या’, असे एका गणेशभक्ताने सुचवले.


Multi Language |Offline reading | PDF