लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि पालकांचे पाल्यांवर लक्ष असणे आवश्यक ! – रमेश पडवळ, हिंदुत्वनिष्ठ

परळे (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु धर्मजागृती सभा

सभेत मार्गदर्शन करतांना हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २४ सप्टेंबर (वार्ता.) – लव्ह जिहाद रोखण्यासाठी धर्मशिक्षण आणि त्यासमवेत पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ यांनी केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने परळे या गावी हिंदु धर्म आणि धर्मावरील आघात यांची माहिती ग्रामस्थांना देण्यासाठी श्री नवसंदेश तरुण मंडळाच्या वतीने १८ सप्टेंबरला सायंकाळी ७.३० वाजता जोतिर्लिंग मंदिर येथे छोटी हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा लाभ १०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.

कार्यक्रमात वरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच श्री. तानाजी जामदार, उपसरपंच श्री. जयवंत चौगुले, धर्मप्रेमी सर्वश्री पांडुरंग पाटील, ज्ञानदेव पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, चारुदत्त पोतदार, दिलीप कुंभार, शाहीर संघटनेचे अध्यक्ष सर्वश्री दगडू पाटील, सुरेश हारूगडे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्र्रमस्थळी सनातन-निर्मित उत्पादनांचा कक्ष, धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते.

क्षणचित्र

नवसंदेश तरुण मंडळाने सनातनचे ६९ लघुग्रंथ उपस्थितांना भेट दिले, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली.

मान्यवरांचे मनोगत…

१. श्री. रमेश पडवळ – हिंदु तरुणींना पद्धतशीरपणे कृत्रिम प्रेमाचा आव आणून शाळा, महाविद्यालये, शिकवणीवर्ग येथे साहाय्य करण्याचा आभास निर्माण करून धर्मांध हिंदु तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करत आहेत. त्यानंंतर या तरुणींसमवेत निकाह करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यात येते, कारण तरुणींना जाळ्यात ओढणार्‍या धर्मांधांचे पूर्वी विवाह झालेले असतात. हिंदु तरुणीशिवाय विवाहित हिंदु महिलांही याला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

२. आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे – धर्म आणि अध्यात्म यांचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेवर केले जाणारे सर्व आरोप हे निराधार आहेत. हिंदु धर्म प्रसाराचे हे कार्य थांबावे आणि अन्वेषण भरकटत जावे यासाठी सनातनवर सतत आरोप होत आहेत. आतापर्यंत कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातन संस्था आरोपी असल्याचा उल्लेख केलेला नाही, उलट सनातनच्या सर्व साधकांची निर्दोष सुटका झालेली आहे.

३. श्री. किरण दुसे – धर्म आणि राष्ट्र यांवर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी पुन्हा एकदा भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी प्रयत्न करणे, जागृती करणे हीच सध्याच्या काळातील सर्वोत्तम साधना आहे. संतांचा आशीर्वाद आणि त्यांचा संकल्प यांमुळे २०२३ वर्षी हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र आपण साधना म्हणून धर्माच्या बाजूने कार्य केल्यास आपलाही उद्धार होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF