‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत म्हणतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेली अनुभूती !

१. परात्पर गुरु डॉक्टरांंना ‘वन्दे मातरम्’ हे गीत म्हणून दाखवतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना राष्ट्रदेवतेचे दर्शन होऊन त्यांचा भाव जागृत होणे आणि याविषयी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी ‘मला हेच पाहिजे होते. आपल्याला शब्दांच्या पुढे जायचे आहे’, असे सांगणे

‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे संगीताविषयीच्या ज्ञानाचे लिखाण करायच्या. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रगीताचा सराव करून ते सिद्ध करण्यास सांगितले. हे गीत परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असे होण्यासाठी, तसेच त्यात चैतन्य आणि देवतेची स्पंदने येण्यासाठी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सराव केला. नंतर त्या प्रथमच परात्पर गुरुदेवांंसमोर ‘वन्दे मातरम्’ म्हणू लागल्या. तेव्हा त्यांना राष्ट्रदेवतेचे प्रत्यक्ष दर्शन होऊन त्यांची भावजागृती झाली आणि पुढे शब्दच न सुचल्याने त्या ‘वन्दे मातरम्’ पूर्ण म्हणू शकल्या नाहीत. त्यांना संगीतातील वैखरी वाणीच्या पुढील उच्च तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती आली. त्यांनी याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला हेच पाहिजे होते. आपल्याला शब्दांच्या पुढे जायचे आहे.’’

२. ‘वन्दे मातरम्’ म्हणतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना राष्ट्रदेवतेचे होत असलेले दर्शन !

‘वन्दे मातरम्’ या गीताविषयी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ म्हणतात, ‘‘वन्दे मातरम्’ची पहिली दोन कडवी झाली की, लगेच राष्ट्रदेवतेचे दर्शन होते. आधी राष्ट्रदेवतेचे उजवे अंग, म्हणजे उजवी सूर्यनाडी जागृत होऊन राष्ट्र सिद्ध होते. नंतर डावे अंग, म्हणजे चंद्रनाडी सिद्ध होते. देवतेचे पायापासून वरपर्यंत दर्शन होऊ लागते. तिच्या हातातील शस्त्रेही दिसू लागतात. पहिल्यांदा शस्त्राची प्रभावळ आणि नंतर आतील शस्त्र दिसते, म्हणजेच ‘निर्गुणातून निर्मिती होत आहे’, असे दिसते. संगीतशास्त्र हे शब्दांच्याही पुढचे आहे.’’

– श्री. दिवाकर आगावणे, चेन्नई, तमिळनाडू. (१०.२.२०१५)

गुरुप्राप्तीविना खरे संगीत शिकता येत नाही आणि गुरुकृपेविना संगीताच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती होत नाही.’

–  (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now