सरकारने पाकला धडा शिकवावा ! – हुतात्मा सैनिकाच्या मुलाची मागणी

काँग्रेसप्रमाणेच भाजप सरकारमध्ये धाडस नसल्याने ते कधीही पाकला धडा शिकवू शकणार नाही ! पाकला धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शासनकर्ते असणारे हिंदु राष्ट्रच हवे !

सोनीपत (हरियाणा) – पाकच्या सैनिकांनी क्रूरपणे हत्या केलेल्या सीमा सुरक्षा दलाचे हवालदार नरेंद्र सिंह यांच्यावर सोनीपतमधील त्यांच्या मूळ गावी सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या वेळी सिंह यांच्या मुलाने म्हटले की, माझ्या वडिलांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले, त्याचा आम्हाला अभिमान आहे; मात्र केवळ अभिमान करून काहीही होणार नाही. पाकिस्तानच्या कारवाया चालूच रहातील आणि देशाचे सैनिक हुतात्मा होतील अन् आम्हाला केवळ अभिमान वाटत राहील. पाकची आक्रमणे थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF