बहिष्काराचे शस्त्र !

तमिळनाडूत हिंदूंवर होणारे अत्याचार लपून राहिलेले नाहीत. येथे धर्मांध ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून हिंदुविरोधी कारवाया होतच असतात. त्यात भरीस भर म्हणजे स्वतःला ‘द्रविडी’ म्हणवून घेणार्‍या आणि स्वतंत्र द्रविडिस्तानची मागणी करणार्‍या लोकांच्याही कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे तमिळनाडू हे हिंदूंसाठी धोक्याचे स्थान बनले आहे. येथील स्थिती इतकी बिकट आहे की, येथे हिंदूंना त्यांचे सण-उत्सव साजरे करणेही दुरापस्त झाले आहे. १४ सप्टेंबरला राज्यातील शेनकोत्ताई गावात सुमारे ३० हून अधिक श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. ‘ही दंगल पूर्वनियोजित होती’, तसेच ‘जेव्हा अशा दंगली घडतात, तेव्हा त्याचा फटका हिंदूंनाच बसतो’, हेही वेगळे सांगायला नको. धर्मांधांनी येथील हिंदूंची घरे आणि दुकाने जाळली. वास्तविक येथे हिंदूंची संख्या ७० टक्क्यांहून अधिक आहे आणि धर्मांधांची संख्या २० टक्क्यांच्या आसपास आहे. असे असतांनाही धर्मांधांच्या उद्दामपणाचा हिंदूंना वारंवार प्रत्यय आला आहे. याला कुठे तरी आळा घालावा, यासाठी नाईलाज म्हणून हिंदूंनी गावातील मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालण्याचे जाहीर केले आहे. तसे पाहिले, तर हिंदु समाज हा सहिष्णु समाज म्हणून ओळखला जातो. ‘कोणाच्या अध्यात न मध्यात पडता स्वतःचे काम भले’ अशी सर्वसाधारणे हिंदूंची मानसिकता असते. हिंदु समाज हा निरूपद्रवी आहेे; मात्र स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या याच गुणाचा निधर्मी राजकारणी आणि धर्मांध यांनी अपलाभ उठवला. आज शेनकोत्ताई येथे हिंदूंची जी स्थिती झाली आहे, त्यास सत्ताधारी अण्णाद्रमुक, विरोधी पक्ष द्रमुक आणि तेथील प्रशासन उत्तरदायी आहे. महत्त्वाचे म्हणजे गावातील धर्मांधांनी हिंदूंवर पेट्रोल बॉम्ब फेकणे, हे गंभीर आहे. एका छोट्याशा गावात धर्मांधांकडे पेट्रोल बॉम्ब कुठून आले ? धर्मांधांनी ते बनवेपर्यंत, त्याचा साठा करेपर्यंत पोलीस झोपले होते का ? या छोट्याशा गावात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथील हिंदूंसाठी अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या सर्व सूत्रांचा विचार करून तेथील हिंदूंनी आता बहिष्काराचे शस्त्र उगारले आहे. वास्तविक लोकशाहीत बहिष्कार घालणे हे घटनाविरोधी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदूंनी असे काही तरी केल्यावर त्यांच्यावर ‘लोकशाहीविरोधी’ असा ठपका ठेवायला निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि (अ)विचारवंत मोकळे होतील. असे असले, तरी ‘अशा सहिष्णु समाजावर ही वेळ का आली ?’, या प्रश्‍नाचे उत्तर हिंदूंना जाब विचारणार्‍यांनी द्यायचे आहे.

हिंदूंना लक्ष्य करणे चुकीचे !

स्वातंत्र्यानंतर हिंदूंना नेहमीच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून त्यांना जाब विचारण्याचा प्रकार सर्वांकडून होत राहिला आहे. ‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी काही उपाययोजना काढल्यास, त्यांना ती काढू देणार नाही’, असे एकंदरीत सर्वांचेच धोरण दिसते. भारतात हिंदूंची संख्या अधिक असली, तरी हिंदूंना न्याय मिळतो का ? प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी हिंदूंना झगडावे लागते. काही वेळा हिंदूंना सर्वच दरवाजे बंद झाल्यावर त्यांना काही तरी उपाययोजना काढाव्या लागतात. मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार घालणे, हा त्यातील एक प्रकार होय. केवळ शेनकोत्ताई येथील हिंदूंनी असा निर्णय घेतला आहे, असे नव्हे. अशा घटना भारतात बर्‍याच ठिकाणी घडत असतात. अलीकडेच हरियाणातील गुरुग्राममध्येही असाच प्रकार घडला. तेथी शीतला कॉलनीमध्ये धर्मांधांनी भाड्यात घेतलेल्या सदनिकेचे मशिदीमध्ये रूपांतर केले. हिंदूंनी आंदोलन करून पोलिसांना या सदनिकेला ‘सील’ करण्यास भाग पाडले. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी बैठक घेऊन ‘धर्मांधांना दुकाने आणि घर भाड्याने देणार नाही’, असा ठराव संमत केला. काही मासांपूर्वी एका मुसलमान अभिनेत्रीने ‘मी मुसलमान आहे; म्हणून मला भाड्याने घर मिळत नाही’, असा दावा केला होता. त्यानंतर निधर्मीवाद्यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक होते. ‘हिंदूंनी असे करणे, ही घटनेची पायमल्ली कशी आहे, याविषयी निधर्मीवाद्यांनी हिंदूंना फुकाचे सल्ले देण्यास आरंभ केला. वास्तविक ‘मुसलमानांवर ही वेळ का आली ?, या प्रश्‍नाचे उत्तर कोणी देत नाही. सध्या भारतभर ‘लव्ह जिहाद’चे प्रस्थ वाढत आहे. हिंदूंच्या जमिनी बळकावणे, हिंदूंच्या सणांच्या काळात दंगली घडवून आणणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड आदी गोष्टी करून धर्मांधांनी समाजात दहशत माजवली आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. या भावनेमुळे हिंदुबहुल भागातील हिंदू मुसलमानांना भाड्याने घर देण्यास उत्सुक नसतात. यात दोष हिंदूंचा कि मुसलमानांचा ? स्वतःची, स्वतःच्या कुटुंबियांची, तसेच स्वतःच्या मुलींच्या सुरक्षिततेची काळजी करणे हा काही गुन्हा आहे का ? आज हिंदूंच्या सुरक्षिततेचे दायित्व घेण्यास कोणीही सिद्ध नाही. त्यामुळेच उत्तरप्रदेशातील कैरानासारख्या ठिकाणी धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदू गाव सोडून निघून जातात आणि प्रशासन, पोलीस आणि राजकारणी बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे हिंदू आता स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतःच काही पावले उचलत आहेत. अशा वेळी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्याऐवजी वस्तूस्थितीजन्य विचार करून हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. एका समूहामध्ये अथवा समाजात सतत अन्याय होत असल्याची भावना मनात रूजल्यास नंतर त्याचे उद्रेकात रूपांतर होते. हिंदु समाजाने असे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी आता शासनकर्त्यांनीच पावले उचलणे आवश्यक !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now