अटकेतील सुजीत कुमार यांची पोलीस कोठडीमध्ये मारहाण झाल्याची न्यायालयात तक्रार !

नालासोपारा कथित शस्त्रसाठा प्रकरण

मुंबई – नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले सुजीत कुमार यांनी पोलीस कोठडीमध्ये कमरेच्या पट्ट्याने आणि काठीने मारहाण केल्याचे न्यायालयात सांगितले. न्यायालयाने तात्काळ त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवले आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी कुमार यांना अटक केली होती. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने १२ सप्टेंबरला त्यांचा ताबा घेतला. १७ सप्टेंबर या दिवशी वाढीव कोठडीसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी जळगावमधून अटक केलेला आरोपी लीलाधर उपाख्य विजय लोधी आणि वासुदेव सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीमध्ये २४ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now