श्रीलंकेमध्ये मंदिरांमध्ये होणार्‍या पशूबळींवर बंदी घालण्यासाठी कायदा बनवण्यात येणार

मुसलमानांच्या पशूबळी प्रथेवर मात्र बंदी नाही !

श्रीलंकेतील हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा यांविषयी मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आवाज उठवणार का ?

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका सरकार देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये दिल्या जाणार्‍या पशूबळींवर बंदी घालणारा कायदा बनवणार आहे. हिंदु धार्मिक प्रकरणांविषयीच्या मंत्र्यांनी याविषयीचा प्रस्ताव दिला असून त्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. याशिवाय या प्रस्तावास स्थानिक पुरोगाम्यांनीही पाठिंबा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरांमध्ये होणार्‍या पशूबळींना येथे विरोध केला जात आहे. प्राण्यांच्या अधिकारांसाठी कार्य करणारे, तसेच बौद्ध आणि हिंदु पुरोगामी याला ‘अमानवी’ म्हणत आहेत. त्यामुळे सरकार यावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी न्यायालयाच्या आदेशामुळेही काही मंदिरांमध्ये बळी प्रथेवर बंदी घालण्यात आली आहे. हिंदु संघटनांनी मात्र सरकारच्या या बंदी प्रस्तावाला विरोध केला आहे.

१. परंपरांमुळे श्रीलंकेतील काही मंदिरांमध्ये बळींसाठी बकरा, म्हैस आणि कोंबडी यांचा बळी दिला जातो. श्रीलंकेमध्ये १२ टक्के हिंदू आहेत.

२. हिंदूंच्या व्यतिरिक्त मुसलमानही पशूबळी देतात. श्रीलंकेत बौद्ध आणि हिंदू यांच्यानंतर मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे; मात्र त्यांच्या बळीप्रथेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव सरकारने केलेला नाही.

३. गेल्या काही वर्षांत श्रीलंकेत धार्मिक तणावांच्या घटना वाढल्या आहेत. मार्च मासांत झालेल्या मुसलमानविरोधी दंगलीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. या वेळी मशिदी, घरे आणि दुकाने यांची तोडफोड करण्यात आली होती.


Multi Language |Offline reading | PDF