मशिदीमध्ये ८ वर्षांच्या मुलावर मौलवीकडून लैंगिक अत्याचार

मशीद, मदरसे, चर्च येथे होणार्‍या लैंगिक अत्याचारांची वृत्ते भारतीय प्रसारमाध्यमे दडपतात आणि हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना कुप्रसिद्धी देतात; कारण ती स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘पुरो(अधो)गामी’ म्हणवून घेतात !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे महंमद तैय्यब नावाच्या मौलवीने मशिदीतच ८ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तैय्यब याला अटक केली. आणखी किती मुलांसोबत या मौलवीने अशा प्रकारचे कृत्य केले आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. पीडित मुलगा मशिदीत प्रतिदिन कुराण वाचण्यासाठी जात होता. ११ सप्टेंबरच्या रात्री मशिदीतील मौलवीने कुराण वाचून झाल्यानंतर सर्व मुलांना घरी पाठवले; मात्र या मुलाला थांबवून घेतले. त्यानंतर मौलवीने त्या मुलाला मशिदीतच असलेल्या एका खोलीत नेले आणि तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now