रुपयाची अवस्था पाहून लाजेलाही लाज वाटेल ! – योगऋषी रामदेवबाबा

जे एका योगऋषींना वाटते, ते केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप सरकारमधील एकाही मंत्री यांना का वाटत नाही ?

नवी देहली – रुपयाची आजची अवस्था पाहून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते. रुपयाच्या घसरलेल्या मूल्यावर विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी वरील उत्तर दिले.

रामदेवबाबा यांनी मांडलेली सूत्रे

१. राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे; पण देशाचा आर्थिक विकास दर वाढला नाही, तर देश कसा पुढे जाईल ? देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील.

२. विजय मल्ल्या प्रकरणात अनेक जण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचे खासदार होते, त्या वेळी त्यांना कोणी पाठिंबा दिला ? हानी होत असूनही मल्ल्या यांना कुणी साहाय्य केले ?, याचे अन्वेषण केले पाहिजे.

३. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही अप्रामाणिक लोकांमुळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now